आदिवासी महिलांना मान्हेरे येथे वेलो वॉटर ड्रम चे वाटप
आदिवासी महिलांना मान्हेरे येथे वेलो वॉटर ड्रम चे वाटप
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मान्हेरे येथे वेल्स ऑन व्हील्स (Wells on wheels) चे संस्थापक अध्यक्ष – शाझ मेनन ,प्रकल्प संचालक – अजय देवरे, प्रकल्प व्यवस्थापक – नारायण गभाले यांनी सामाजिक बांधिलकी जपत महिलांना आदिवासी क्षेत्रात वेलो वॉटर ड्रम चे वाटप करण्यात आले
मुलीं, महिलांना रोज पाणी वाहण्याचा त्रास कमी व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून तसेच गावातील मुली पाणी वाहण्याच्या कामामुळे शाळा सोडावी लागते, शाळेमध्ये जाण्यासाठी उशीर होतो त्यामुळे तालुक्यातील कित्येक खेड्यांमध्ये मुलींचे शैक्षणिक नुकसान होतं आहे. हे सर्व रोखण्यासाठी, महिलांचा डोक्यावरचा हंड्याचा भार कमी करण्यासाठी ही संस्था काम करते.
या गावाजवळ भंडारदरा धरण असूनही या गावातील महिलाना पाणी दूरवरून आणावे लागतं आहे . येथे पाण्यासाठी महिला कित्येक किमी लांबीचा प्रवास करावा लागतोय. वेल्स ऑन व्हील्स या संस्थेच्या व्यवस्थापने कडून मान्हेरे येथील भांगरे वस्तीचा सर्वे करण्यात आला. भांगरे वस्तीची संस्थेकडून निवड करण्यात आली. त्यानुसार प्रत्येकी 35 कुटुंबांना 35 ड्रम वाटप करण्यात आले. ड्रम दिल्यानंतर मुली व महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झालेला होता. यापुढे कधीच शाळेला उशीर होणार नाही, महिलांना होणारा शारीरिक त्रास आता कमी होईल, मुलींच्या शिक्षणाला आता अडथळा येणार नाही असे मत गावातील महिला श्रीमती फसाबाई भांगरे व श्रीमती गऊबाई भांगरे यांनी व्यक्त केले.
महिलांच्या डोक्यावरचा भार कमी व्हावा तसेच पाणी करीता सोशावे लागणारे कष्ट, संघर्ष टाळता आला पाहीजे. कमी वेळात जास्त पाणी आणता यायला हवे कष्टकरी महिलांचा वेळ वाचला पाहीजे. पाणी डोक्यावर वाहतांना मणक्याचे विकार, पाठदुखी, कंबर, मान, हात पाय दुखणे हि दुखणी टाळता आली पाहिजेत. या हेतूने या गावात वेल्लो व्हॉटर व्हील ड्रमचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे पदाधिकारी नारायण गभाले सर, विजय देवरे, स्वयंसेवक महादेव तसेच सामाजिक कार्यकर्ते दशरथ गभाले, युवराज गभाले सर, एकनाथ बांबळे, देवचंद भांगरे, अरुण गभाले व इतर ग्रामस्थ, गावातील महिला, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———-