नऊ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार ,सांगली हादरली!

डॉ शाम जाधव
सांगली आज दिनांक १४/१०/२०२४ रोजी संजयनगर मध्ये दोन महिन्याच्या आत आँगस्ट महिन्यात चिंतामणीनगर झोपडपट्टीत नराधम संजय माने याने लहान मुलीवर अत्याचार व आता ०८/१०/२०२४ रोजी संजयनगर झोपडपट्टी पत्राचाळ येथे ईश्वर उर्फ राहुल कांबळे याने 9वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आहे़. सदर दोन्ही घटना विक्रुत माणुसीकीला कांळीबा फासणारे आहेत. त्यामुळे संजयनगर मध्ये मुली व महिला यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी दोन्ही आरोपीला कठोर शिक्षा होणेचे गरजेचे आहे.

त्यासाठी आज सजयनगर नागरिकांच्या वतीने आरोपीचे वकीलपत्र कोणी घेऊ नये यासाठी सांगली बार असोसिएशन चे अध्यक्ष अँड. किरण रजपुत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांचाशी सकारात्माक चर्चा झाली. त्यांनी आमच्या मागणीला सहमती दर्शविली.
यावेळी नागरिक दिपक माने,देवानंद शिखरे, विलास सर्जे, रौफभाई भालदार,ईर्शाद पखाली,वासिम बलबंड, कादीर मुजावर, वाशीद पठाण,आंनदा ऐवळे, आसिफ मुजावर, मोहसीन बेळगी ळगी, ईरफान मुलाणी, गुलाब जमादार, शशीकांत कांबळे आदी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.