आमदार लंकेच्या माध्यमातून सैनिकांसाठी १ कोटी रुपयांचे स्मारक बांधणार – सौ राणीताई लंके
सुप्यात कारगिल विजय दिवस साजरा
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
भारत देशाच्या जडणघडणीत व संरक्षणामध्ये आजी माजी सैनिकांचा सिंहाचा वाटा असून जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे संरक्षण करत आहे. त्यामुळे आमदार निलेश लंके माध्यमातून पारनेर तालुक्यात एक कोटी रुपयांचे स्मारक व कार्यालय या आजी-माजी सैनिकांसाठी उभारणार असल्याची ग्वाही जिल्हा नियोजन समिती व जि .प सदस्या सौ राणीताई लंके यांनी दिली आहे. पारनेर तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या वतीने सुप्यातील सफलता मंगल कार्यालयात २२ कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला असल्याची माहिती आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष कारभारी पोटघन मेजर यांनी दिली आहे. हा कार्यक्रम साजरा करत असताना सैन्यातील शहिदांना संघटनेच्या वतीने प्रथम आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान आजी-माजी सैनिकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्कूल बॅग वाटप करून सत्कार पण करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना कॅप्टन वराळ यांनी केली असून संघटनेचे मार्गदर्शक कर्नल साहेबराव शेळके यांनी संघटनेची उद्दिष्टे व भविष्यात संघटनेच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांसाठी विविध प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी सदगुरू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व राष्ट्रगीत सादर केले.
– शहीद रामचंद्र साठे कुटुंबीयांना जमीन मिळवून देण्यासाठी पुढाकार कारभारी पोटघन
पारनेर तालुक्याची लोणी हवेली येथील भूमिपुत्र व शहीद जवान रामचंद्र साठे यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून शासकीय शेतजमीन मिळवुन देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष कारभारी पोटघन यांनी सांगितले. तर दुसरीकडे तालुक्यातील गावोगावी या आजी माजी सैनिक संघटनेचा विस्तार करणार असून त्या माध्यमातून सैनिकांचे प्रश्न सोडवणार असल्याचे तालुकाध्यक्ष पोटघन म्हणाले.
– सैनिक संघटनेच्या वतीने वीरमाता व वीर पत्नीला साडी चोळी.. तालुकाध्यक्ष कारभारी पोटघन
पाणी तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे तुम्ही बाविसावा कारगिल दिन सुप्यात साजरा करण्यात आला असून यावेळी सैनिक संघटनेच्या वीर माता व वीर पत्नीचा साडीचोळी देऊन अनोखा सन्मान करण्यात आला. देशाच्या जडणघडणीत या सैनिकाला साथ देणाऱ्या माता भगिनींचा सन्मान केल्याने त्यांना य कार्यक्रमात गहिवरून आले.