वर्षभरात कडूस येथे दोन कोटींची विकास कामे. -सरपंच मनोज मुंगसे

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
कडूस येथे गेल्या वर्षभरात सरपंच मनोज मुंगसे यांच्या पाठपुराव्याने सुमारे २ कोटी २८ लाख रुपयांची विकासकामे मार्गी लागली. .
सरपंच मनोज मुंगसे यांनी माहिती देताना सांगितले की दीड वर्षभरापूर्वी ग्रामपंचाती मध्ये सत्तेत आल्यानंतर अनेक सार्वजनिक विकासकामे तसेच वैयक्तिक लाभाच्या विविध योजना मार्गी लावल्या आहेत
.त्यात १० लक्ष स्मशाभूमीतील सुशोभीकरण ,१५ लक्ष गाळे बांधणे(शॉपिंग सेंटर)९.५० लक्ष, शाळा खोली,४१ लक्ष ,पाडळी विहीर ते कडूस पिण्याचे पाण्याची पाइपलाइन,१ कोटी १० लक्ष तलाव दुरुस्ती,१५ लक्ष कडूस येवती रस्ता डांबरीकरण ,१५ लक्ष पळ ओढ्यवर केटी वेअर,४ लक्ष ठूबे वस्ती मुंगसे वस्ती पाइपलाईन ,१ लक्ष समाज मंदिराभोवती काँक्रिटकरण,१ लक्ष जिल्हा परिषद शाळेत खेळणी बसवणे,३ लक्ष नरवडे अळी ड्रेनेज लाईन,४ लक्ष मुंगसेवाडा ते रावडे अळी ड्रेनेज लाईन या सह अनेक छोटी मोठी कामे मार्गी लागली आहेत.
मनोज मुंगसे यांनी कमी वयात सरपंचपदाचा कारभार हाती घेतला. नामदार शंकरराव गडाख,जिल्हा परिषद बांधकाम समितीचे मा. सभापती काशिनाथ दाते ,मा.सभापती गणेश शेळके यांच्या माध्यमातून विविध खात्यातुन निधी मिळवला. हा निधी मिळवण्यासाठी जिल्हा परिषद जलसंधारण सदस्य राहुलदादा शिंदे पाटील , बाजार समिती संचालक युवराज पाटील यांची मोलाची मदत झाल्याचे ग्रामपंचात सदस्या मीना मुंगसे व राखी शिंदे यांनी सांगितले.