इतर

नगर- पुणे महामार्गावर लुटणाऱ्या दोघांना अटक; सुपा पोलिसांची कारवाई

दत्ता ठुबे

पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावरील पळवे शिवारात दि. २६ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास प्रवासी म्हणून बसलेल्या आरोपीने ट्रकचालकास लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार ट्रक चालक राजेश अशोक झरेकर (वय ४३, रा. कामरगाव ता. जि. अहमदनगर) हा एम. एच. ४२ टी. ०४६३ या ट्रकमध्ये अहमदनगर एमआयडीसीतून लोखंडी पाईपचा घेऊन जात होता. सुपा टोल नाक्यावर आरोपी ज्ञानेश्वर जनार्धन कोकाटे (रा. टाकळीमिया, ता. राहुरी) हा प्रवासी म्हणून ट्रकमध्ये बसला. ट्रक पळवे शिवारात आल्यावर आरोपीने मोबाईल चार्जच्या केबलने

चालकाचा गळा आवळून ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाने ट्रक रोडवर आडवा लावून ट्रकमधून उडी मारून ट्रकमालकास घटनेबाबत माहिती दिली. आरोपीने तेथे येऊन चालकाशी झटापट करून चावी घेऊन ट्रक पळवून नेला. त्याचवेळी ट्रकमालक व त्याचे दोन साथीदार तेथे पोहचले, त्यांनी पाठलाग करून मालासह ट्रक पकडला व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी व ट्रक ताब्यात घेतला. पो.नि. नितीनकुमार गोकावे यांनी आरोपी कोकाटे याच्याकडे विचारपूस केली असता, त्याच्यासोबत आशिष दगडू खपके रा. हरेगाव, फाटा ता. श्रीरामपूर हा असल्याचे समजले. पोलिसांनी हरेगाव येथे जाऊन पोकॉ. प्रशांत राठोड यांच्या मदतीने खपके यास कारसह ताब्यात घेतले. ही कामगिरी सुपा पोलिस निरीक्षक नीतीन कुमार गोकावे, सहाय्यक फौजदार सुनील कुटे, पोहेकॉ. अशोक मरकड, पोहेकॉ. अमोल धामणे, पोहेकॉ. छबुराव कोतकर, पोना. खंडेराव शिंदे, पोना. यशवंत ठोंबरे यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button