देशविदेश

बिडी कामगारांच्या मुलांचे शिष्यवृत्तीत वाढ, देश भरातील 80 लाख बिडी कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद!

भारतीय मजदूर संघाच्या मागणी ला यश

पुणे प्रतिनिधी
भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाने दि 6/4/2022 च्या आदेशानुसार बिडी कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत वाढ केली आहे

या आदेशामुळे याचा फायदा देशभरातील सुमारे 80 लाख बिडी कामगारांना होणार आहे.
भारतीय मजदूर संघाने 1999 साली बिडी कामगारांची आर्थिक परिस्थिती हालाखीचे व गरीब ची असल्याने त्यांची मुले चांगले मार्क मिळवून ही शिष्यवृत्ती लाभ मिळू शकत नाही ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिले यावेळी भारतीय मजदूर संघाने शैक्षणीक आर्थिक मदत शब्द प्रचलित केला व पास झालेल्या सर्व मुलांना आर्थिक मदत मिळू लागली या वेळी आर्थिक शैक्षणीक मदतीची दर ठरविण्यात आले होते. या नंतर रोजगाराची अस्थिर परिस्थिती, वाढलेली महागाई पहाता शैक्षणिक मदतीत वाढ करण्यात यावी . या बाबतीत तत्कालीन केंद्रीय कामगार मंत्री श्री संतोषकुमार गंगवार व केंद्रीय कामगार मंत्री श्री भूपेंद्र यादव यांच्या समावेत चर्चा करून सततच्या पाठपुरावा केला

केंद सरकारने प्राथमिक शिक्षणासाठी 250 रू वरून 1000 रू प्रति वर्ष , माध्यमिक शिक्षणासाठी रू 500 वरून रू 2000 प्रति वर्ष व पदवी करिता रू 3000 वरून 6000 रू प्रति वर्ष व व्यावसायिक पदवी करिता रू 15000 वरून 25000 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
सदरील शैक्षणिक मदत मिळवण्यासाठी आॅन लाईन अर्ज करणे आवश्यक आहे तरी बिडी कामगारांनी अर्ज करण्याचे आवाहन अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाच (संलग्न भारतीय मजदूर संघ) राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश विस्वाद यांनी केले आहे.

—- —

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button