भंडारदरा परिसरात सो रट जुगार चालकांवर गुन्हा दाखल

भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पांजरे येथे रविवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास हार – जितची सोरट नावाची जुगार खेळताना दोन व्यक्तींना राजुर पोलिसांनी रंगेहाथ पकडले असुन या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारदरा परिसरातील पांजरे येथे रविवर व सोमवार असे दोन दिवस बोहड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . हा बोहड्याचा कार्यक्रमा प्रसंगी अकोले – ईगतपुरी तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते . या गर्दीचा लाभ उठवत काही तरुणांनी शाळेच्या भिंतीच्या आडोशाला एका कागदावर चिठ्ठीरुपी सोरट जुगार लावली होती
. राजुर पोलिसांना याची कुणकुण लागताच पोलीस तात्काळ पांजरे येथे दाखल होत हारजितचा सोरट जुगार खेळणा-या ठिकाणी छापा टाकला व दोन सोरट चालकांना ताब्यात घेतले . या दोघाकडुन १२५० रु रोख जप्त करण्यात आले असुन या व्यक्तीविरोधात पो .काॅ. अशोक गाडे यांनी फिर्याद दिल्याने सुभाष नामदेव भले (वय २६ वर्ष), दत्तु सुखदेव मालक( वय २६वर्ष) रा .नांदगाव ता ईगतपुरी यांच्यावर कलम 106/2022 मुंबई जुगार ॲक्ट कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
.वरील गुन्ह्याचा तपास राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो .ना .दिलीप डगळे , अशोक गाडे , करत आहेत .
पांजरे येथे हार जितचा सोरट खेळत असताना अचानक पोलिसांची धाड पडल्याने सोरट खेळणा-यांची त्रेधातिरपट उडाली .अनेक तरुणांना पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद बसला . तर अनेक तरुण फरार झाले . पोलिसांनी धाड टाकत दोघांना ताब्यात घेतल्यानंतर निघुन गेल्यावरही पांजरे येथे दुस-या दिवसापर्यंत सोरट जुगार सुरुच होती असे ऐकावयास मिळत आहे . तर काही सोरट चालकांचे असे म्हणणे आहे की आम्ही बोहडा आयोजकांना मोठ्या रकमेत देणगी देत असुन त्यांनीच पोलिसांचा बंदोबस्त करायला हवा होता ,असेही दबक्या आवाजात ऐकावयास मिळत आहे.