उडदावणे येथे एकाचा खून.. राजूर पोलिसांनी दोन तासात आरोपी केले जेरबंद

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
उडदावणे गावचे पोलीस पाटील गिन्हे यांनी सपोनि / गणेश इंगळे यांना फोन करुन कळविले की, उडदावणे गावामध्ये सुनिल सोमा गिन्हे याचा खुन झालेला आहे असे पोलीस पाटील यांनी कळविल्यानंतर सदरची माहीती वरिष्ठांना फोनद्वारे कळवुन नमुद ठिकाणी सपोनी/गणेश इंगळे आपले टीम सह सदर ठिकाणी जावुन सदर घटनेची पाहणी करून मयत सुनिल सोमा गिन्हे यास पोस्ट मार्टम करिता ग्रामिण रुग्नालय राजुर येथे पाठवुन दिले. त्यानंतर सदर ठिकाणी चौकशी करता मयत याची पत्नी हिने कळविले की, काल दि. 16/12/2022 रोजी मयत पती सुनिल सोमा मिन्हे हे शेंडी येथे आठवडे बाजार करून दारु पिवुन घरी आले. त्यानंतर रात्री 08.00 वा. चे सुमारास बाहेर जावून पुन्हा दारू पिवून येवून मला व मुलगा सुरेश गिऱ्हे यास काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन मारहान करत होते. तेव्हा मुलगा सुरेश व दिर एकनाथ गिरे हे त्यास समजावुन सांगत असताना मयत पती हे त्यांना शिवीगाळ करु लागले याचा राग मुलगा सुरेश व दीर एकनाथ यांना आल्याने मुलगा सुरेश व दीर एकनाथ यांनी पती याचा खुन केला आहे. अशी फिर्याद दिल्याने राजूर पोलीस स्टेशनला गु.र.नं. 292/2022 भा.द.वी. कलम 302, 34 प्रमाणे दाखल झाला आहे.
नमुद गुन्हातील आरोपी हे गुन्हा केल्यानंतर फरार झाले होते. आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस अधिक्षक . राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर- श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी/गणेश इंगळे, यांनी गुप्त बातमीदारामार्फत दोन तासात आरोपीचा शोध घेवून त्यांना अटक केली त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे
. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे आदेशाने सपोनी/गणेश इंगळे हे करत आहे.सपोनी/मिथुन घुगे पोहेकॉ विजय मुंडे, पोना, दिलीप डगळे, पोकों/अशोक काळे, पोका/साईनाथ वर्पे , पो का/सुनिल ढाकणे,पो का/अशोक गाढ़े. चापोना/ पांडुरंग पटेकर यांनी सर्वांनी तपास कामत मदत केली आहे