प.महाराष्ट्र

लोकांच्या गरजा ओळखून ,सामाजिक विकासा साठी रोटरी उपक्रमांत एकसूत्रता हवी – माजी प्रांतपाल मोहन पालेशा


रोटरी पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

नाशिक, जळगाव जिल्ह्यातील पदाधिकऱ्यांचा सहभाग

नाशिक दि १- सामाजिक विकासासाठी रोटरी संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने करण्यात येत असलेले काम अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता असून तळागाळातील लोकांच्या गरजा ओळखून त्यांचा सामाजिक विकास साधण्यासाठी रोटरी उपक्रमांत एकसूत्रता हवी असे प्रतिपादन रोटरीचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे एक दिवसीय रोटरी पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेचे गुरू गोबिंदसिंग संस्थेच्या सभागृहात नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रांतपाल रमेश मेहेर, माजी प्रांतपाल शब्बीर शाकिर, सीए प्रफुल बरडीया, अजय नरकेसरी उपस्थित होते.
या कार्यशाळेत नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४८ रोटरी क्लबचे सुमारे ३४० पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी बोलतांना डिस्ट्रिक्ट ३०३० चे २०२२-२३ चे प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी
रोटरी क्लबच्या माध्यमातून सेवा करण्याच्या संधीचे सोने करावे तसेच आपले काम सचोटीने करावे असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी प्रांतपाल सर्वश्री महेश मोकळकर, राजीव शर्मा, किशोर केडिया आणि इतर माजी प्रांतपालांनीही मार्गदर्शन केले. भुसावळचे आमदार रोटेरीयन संजय सावकारे यांची विशेष उपस्थिती होती.

मोठ्या उत्साहात पार पडलेली ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री ओमप्रकाश रावत, मंगेश अपशंकर, श्री व सौ. देवधर, सुधीर जोशी, अदिती अग्रवाल, तेजपाल बोरा, राज तलरेजा, अनिल सुकेनकर, डॉ. रामनाथ जगताप, सतीश मंडोरा, डॉ. गौरव सामनेरकर, विजय दिक्षित, पराग जोशी, ऋषिकेश सम्मनवार, मुग्धा लेले, दमयंती बरडीया, दिलीपसिंह बेनिवाल, शिल्पा पारख, अमोल काबरा, पराग पाटोदकर, सोनल शहा, राजीव नाथानी, राजेश डीडवानिया यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रारंभी डॉ. श्रिया कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सागर भदाने यांनी सूत्रसंचालन केले. गनी मेमन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रोटरी क्लब नाशिकचे २०२२-२३ चे अध्यक्ष सीए प्रफुल बरडीया आणि प्रांत सचिव श्रीनिवास लेले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
………….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button