अखिल भारतीय माळी महासंघा कडून गुणवंतांचा गौरव!

पुणे प्रतिनिधी
अखिल भारतीय माळी महासंघ पुणे शहर कार्यकारणी पदाधिकारी यांची अखिल भारतीय माळी महासंघ विश्वस्त विठ्ठल सातव यांच्या अध्यक्षतेच्या खाली साफ्ताहिक मीटिंग आधार ना. स. पतसंस्था हॉल ससाणे नगर , हडपसर येथे घेण्यात आली . या मीटिंग मध्ये पेरणेगाव उपसरपंच पदी मा. सौ. प्रीती संतोष कापरे यांची निवड झाल्या बद्दल, मा. छाया किरण कानपिळे, हिंगणे मळा हडपसर, यांनी महाराष्ट्रातून ५५ वा क्रमांक मिळवून PSI(पी.एस.आय) परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल, मा. तुषार बापूसाहेब कोरपडे, आनंद नगर, हडपसर BAMS (बी.ए.एम.एस.) डिग्री मिळवून डॉक्टर झाल्या बद्दल, मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र, सावित्रीमाई फुले महात्मा फुले दामपत्यांचा फोटो देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

जातनिहाय जनगणना , राजकीय ओबीसी आरक्षण पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन करणे , कार्यकारणी विस्तार करणे इ. विषयावर चर्चा करण्यात आली .
या प्रसंगी कुंडलिक गायकवाड, महेश मारुती ससाणे, संतोष एकनाथ शिवरकर, किसन मुरलीधर राऊत , संतोष नारायण कोद्रे , जयंता शंकर दर्शले , सौ. उज्वला शिवाजी टिळेकर , मनिषा प्रसाद राऊत , लीना संतोष शिवरकर , संगीता बोराटे , एक्स सुभेदार मोहन शेलार , संतोष किसनराव कापरे , श्रद्धा चंद्रकांत टिळेकर , सौ. माधुरी चंद्रकांत टिळेकर , महेश वसंतराव भुजबळ , सतीश दिनकर माळी , सुभाष राजाराम ससाणे , उत्तम नारायण झुरंगे इ. मान्यवरांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते .