आजचे पंचांग व राशिभविष्य दि ०२/०६/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठा १२ शके १९४४
दिनांक :- ०२/०६/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०१,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति २४:१८,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति १६:०४,
योग :- गंड समाप्ति २६:३५,
करण :- तैतिल समाप्ति ११:०३,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – रोहिणी,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:०६ ते ०३:४४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०५:५३ ते ०७:३२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२७ ते ०२:०६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०६ ते ०३:४४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:२३ ते ०७:०१ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
रंभाव्रत,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ १२ शके १९४४
दिनांक = ०२/०६/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
थोडेसे मनाविरुद्ध वागावे लागू शकते. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. कामात मोठे बदल करण्याचा विचार करू नये. जवळच्या मित्रांशी दुरावा वाढू शकतो. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
वृषभ
कामात काही अनपेक्षित बदल घडून येतील. घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. कामातील अडचणी दूर कराव्या लागतील.
मिथुन
नियोजनबद्ध कामे करावीत. कष्टाला मागेपुढे पाहू नका. वडीलधार्या व्यक्ति तुमच्यावर नाराज होऊ शकतात. प्रवासात मनस्ताप वाढू शकतो. नियमांचे काटेकोरपणे पालन कराल.
कर्क
किरकोळ दुखापत संभवते. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करेल. थोरांचे वेळेवर मार्गदर्शन घ्यावे. आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. घराबाहेर वावरतांना सतर्क राहावे.
सिंह
प्रिय व्यक्तीशी दुरावा वाढू शकतो. भागीदाराशी समजुतीने घ्यावे. अपचनाचा त्रास संभवतो. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे.
कन्या
हाताखालील लोकांकडे बारीक लक्ष द्यावे. कामाचा ताण अधिक जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक वृद्धीचा लाभ उठवावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
तूळ
प्रेमप्रकरणाला वेगळी कलाटणी लागू शकते. रेस जुगारातून नुकसान संभवते. चोरांपासून सावध राहावे. मानसिक ताण काहीसा वाढू शकतो. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे.
वृश्चिक
जवळच्या मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कौटुंबिक अडचणीवर मात करता येईल. उष्णतेचा विकार बळावू शकतो. पित्त प्रकृती असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
धनू
जवळचा प्रवास टाळलेलाच बरा. भावंडांशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. नसते साहस महागात पडू शकते. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा लागेल. भागीदारीच्या व्यवसायात नवीन ओळखी होतील.
मकर
स्वत:त काही जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. अचानक काही खर्च सामोरे येतील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. बोलताना शब्दांचे भान ठेवावे. मत्सराला बळी पडू नका.
कुंभ
उगाच कोणाशीही शत्रुत्व पत्करू नका. अपचनाचा त्रास वाढू शकतो. कापणे, भाजणे यांसारखे किरकोळ त्रास संभवतात. परिस्थितीला नांवे ठेवू नका. शांतता व संयम बाळगावा.
मीन
मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. धैर्याने नवीन कामाला सामोरे जा. जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर