
निवडणूक कधीही सोपी नसते,
गाफील राहू नका – रमेश काका देशमुख
खाते उघडले आहे, आपला विजय निश्चित आहे- सिताराम पाटील देशमुख
कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील अग्रेसर असणाऱ्या कोतुळ आदिवासी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून आज श्रीक्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला
दोन्ही विरोधी गटांनी आपला प्रचाराचा नारळ कोतुळेश्वर देवस्थान येथे फोडून प्रचाराचा शुभारंभ केला आता कोतुळेश्वर कोणत्या गटाला कौल देतो याकडे लक्ष लागले आहे कोतुळेश्वर शेतकरी विकास मंडळाने सकाळी कोतुळेश्वर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी पोतेभर नारळ फोडण्यात आले
त्यानंतर काही वेळाने दुसऱ्या गटाच्या शेतकरी विकास मंडळाने याच ठिकाणी आपल्या पॅनल प्रचाराचा नारळ फोडून प्रचार शुभारंभ केला
निवडणूक कधीही सोपी नसते,
गाफील राहू नका – रमेश काका देशमुख
“””””””””””””””””””””””

निवडणुकीत मन लावून काम करा गाफील राहू नका निवडणूक कधीही सोपी नसते कायम राजकारण करणारे कधीही एक फुली मारत नाही पॅनल टू पॅनल मतदान करा एकाच फुली मूळे सर्व पॅनल धोक्यात येऊ शकतो यामुळे पॅनल टू पॅनल मतदान करा असे जिल्हा परिषद सदस्य रमेश काका देशमुख यांनी सांगितले

आपल्याकडे पुढारी नसले तरी सभासद आपल्या सोबत आहेत कर्जावर संस्था चालते सभासदांची संस्था आहे संस्था टिकली पाहिजे असे काम केले पाहिजे सभासदांपर्यत जाऊन आपली भूमिका सांगितली पाहिजे असे माजी चेअरमन बाळासाहेब जानकिराम देशमुख यांनी सांगितले
पॅनल मध्ये सर्व घटकांना न्याय दिला असून एक जीवाणे काम करावे असे बी. के. देशमुख , संजय लोखंडे यांनी सांगितले
यावेळी सोमनाथ घोरपडे, ज्ञानदेव देशमुख ,देविदास देशमुख ,बाळासाहेब भुजबळ रमेश भुजबळ, दत्तात्रय देशमाने, आदी सभासद उपस्थित होते
कोतुळेश्वर आपल्यामागे, आपला विजय निश्चित आहे-
सिताराम पाटील देशमुख
“””””””””””””””””””””

कोतुळेश्वर आपल्या मागे आहे आपल्याला अपयश येणार नाहीं पॅनल च्या सर्व उमेदवारांना विजयी करा चंदू नाना पवार हे उमेदवार एका जागेवर बिनविरोध निवडून आल्याने आपले खाते उघडले आहे आपला विजय निश्चित आहे असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख यांनी यावेळी सांगितले

या प्रसंगी अगस्ती चे माजी संचालक सयाजीराव देशमुख भाजपचे सोमदास पवार भाऊ दाजी पाटील देशमुख शिक्षण संस्थेचे संस्थापक रवींद्र देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले

यावेळी मनोज देशमुख, सुखदेव गीते , संजय देशमुख ,बाळासाहेब देशमुख, संजय पोखरकर ,सुरेश देशमुख, शंकर घोलप, रावजी धराडे ,बाळासाहेब बेळे ,रामनाथ आरोटे ,सुरेश देशमुख आदी उपस्थित होते
———–/——–