इतर

नाशिक येथील शासकीय रुग्णालयास ,रोटरी ने केले वैद्यकीय उपकरणाचे मोफत वितरण!

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नासिक , रोटरी चॅरीटेबल ट्रस्ट
आणि रिंग प्लस ॲक्वा लिमिटेड सिन्नर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शहरातील शासकीय रुग्णालयाला अतिशय आवश्यक अशी विविध मेडिकल उपकरणे मोफत उपलब्ध करून दिली

. नवजात शिशु अति दक्षता विभागास ट्रान्सपोर्ट इन्क्युबेटर , पल्स ऑक्सिमीटर , CPAP मशीन्स विथ ट्युबिंग नेओनाटिकेल आय सी यू यामध्ये अत्यंत गरज होती. हि गरज ओळखूनच रोटरी क्लब ऑफ नासिक , रोटरी चॅरीटेबलें ट्रस्ट व नाशिक सिन्नर येथील रिंग प्लस ॲक्वा लिमिटेड यानी पुढाकार घेत हि सर्व उपकरणे मोफत उपलब्ध करून दिल्या मुळे नवजात शिशुसुरक्षा खूप प्रमाणात वाढेल आणि नवजात शिशुंना याचा लाभ मिळणार आहे

. ह्या कार्यक्रमात रोटरी प्रांत ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या हस्ते हि उपकरणे सुपूर्त करण्यात आलीत . कार्यक्रमास नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात , रोटरी क्लब ऑफ नासिक च्या अध्यक्षा डॉ. श्रीया कूलकणींं व रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button