
अकोले / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील महत्वाची समजली जाणारी शेंडी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली यामध्ये जेष्ठ नेते अशोकराव भांगरे ,जिल्हा परिषद सदस्या सुनिता ताई भांगरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा विकास पॅनलने माजी मंत्री मधूकरराव पिचड ,माजीं आमदार वैभवराव पिचड समर्थक गटाचा दारुण पराभव केला
अकोले तालुक्यातील शेंडी येथील विविध कार्यकारी सोसायटीची संचालक मंडळाच्या 13 जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली . शेंडी येथील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे व भाजपाचे माजी आमदार वैभवराव पिचड यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ही निवडणूक असल्याने संपूर्ण तालुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते .
. बुधवारी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत जनसेवा पॅनलने विरोधी पक्षाचा धुव्वा उडवत सर्व जागांवर विजय मिळवत सोसायटीवर आपले वर्चस्व सिद्ध केले . पांडुरंग खाडे विजय भांगरे, अनंत घाणे यांनी पिचड समर्थक गटाचे नेतृत्व केले
भांगरे सुनिता अशोक , अस्वले बाबुराव, सोमा , भांगरे एकनाथ नामदेव , धनगर चंद्रकांत संतु , खाडे विठ्ठल बापु , मधे भाऊ देवजी , सगभोर सखुबाई निवृत्ती , खाडे राजेंद्र सोमनाथ, मधे राजेंद्र मुरलीधर , गोगा चंदर भांगरे , खाडे अनुसया जेठीराम ,घाटकर राहुल सुरेश या उमेदवारांचा या निवडणुकीत घवघवीत विजय झाला .विजयी उमेदवारांची निवड जाहीर झाल्यानंतर शेंडी येथे मिरवणुक काढण्यात आली .
राजुर गटाच्या जिल्हा परीषद सदस्या सुनिताताई भांगरे यांचा काल वाढदिवस होता वाढदिवसाच्या दिवशीच निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय मिळाल्याने त्यांना व वाढदिवसाचे हे एक वेगळे गिप्ट मिळाले
. ही प्रतिष्ठेची समजली जाणारी निवडणूक जनसेवा मंडळाकडे खेचून आणण्यासाठी राष्टवादीचे प्रमुख नेते अशोकराव भांगरे , शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे ,डाॅ.दिलीप बागडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले . या निवडणुकीमुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीला राष्ट्रवादी ला बळ मिळणार अशी चर्चा शेंडी परीसरात सध्या सुरु आहे.
सर्व सभासदांनी निवडणुकीमध्ये विश्वास टाकून मतदान केले आणि सर्वच्या सर्व जागा निवडून दिल्या याबद्दल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे ,दिलीपराव भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सुनीताताई भांगरे, युवा नेते अमितदादा भांगरे यांनी विजयानंतर मतदारांचे आभार व्यक्त केले
–///—-