सावरगावतळ येथील सोप न नेहे यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील सोपान मारुती नेहे( वय 65 वर्ष)यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे घडली.
त्यांच्या सावरगावतळ येथे गट नं 655 मध्ये त्यांचे स्वतःच्या मालकीचे शेततळे आहे. शुक्रवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान ते पाण्यासाठी आपली मोटार चालू करण्यासाठी गेले असता कागदावरून पाय घसरून ते शेततळ्यात पडले. पहाटेची वेळ आणि जवळपास कोणीही नसल्याने आणि त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मोटार चालू करून बराच वेळ होऊनही ते घरी पुन्हा माघारी का येईना म्हणून त्यांचा मुलगा बाबासाहेब त्यांना पाहण्यासाठी गेला असता ते शेततळ्यात पडल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी आजूबाजूच्या व्यक्तींना मदतीला बोलाविले असता वैभव नेहे आणि इतर ग्रामस्थ मदतीला धावून आले आणि तात्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे उपचारासाठी नेत असतांनाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही माहिती गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना समजली असता पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
उत्तम रामचंद्र गोडसे यांच्या खबरी वरून अ.मृ. रजी. 67/2022 सी.आर.पी.सी. 174 नुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार मार्गदर्शनाखाली पो.हे काँ एस. एस. पाटोळे अधिक तपास करत आहे.
सोपान नेहे हे सतत गावच्या सामाजिक क्षेत्रांत सहभागी होत असे . राजाराम नेहे पाटील दूध संस्था वि.का.सेवा सोसायटी संचालक म्हणून त्यांनी काम केले त्यांच्या. अकस्मित निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.