बाॅक्सविया कंपनीत झालेल्या कामगाराच्या मृत्यू ची चौकशी करा- रविश रासकर
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
बाॅक्सविया कंपनीमध्ये दिनांक 28 रोजी भरत काळे या कामगाराचा मृत्यू झालेला आहे . संपूर्ण कंपनी ही CCTV कॅमेऱ्याच्या अधिरेकीत आहे तरी झालेल्या घटनेची योग्य ती चौकशी करून त्या कामगारास न्याय मिळावा.
यापूर्वीही अशी एक घटना घडलेली असून त्यामध्ये एका कामगाराने आपला हात गमावलेला आहे सदरील घटना ही दुसरी घटना आहे त्यामुळे इतर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कंपनी प्रशासनाकडून उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये योग्य तो बदल करण्याची ताकीद त्यांना द्यावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत. कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल योग्य ती काळजी न घेतल्यास कंपनी प्रशासनाच्या विरोधात मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी दिला.