इतर

पुण्यातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचा गलथान कारभार ,भारतीय मजदूर संघाची निर्दशने!

पुणे दि ८
भविष्य निर्वाह निधी हा कामगारांना मिळणारे सामाजिक सुरक्षा मधील महत्वपूर्ण घटक आहे, सरकारने भविष्य निर्वाह निधी च्या सुविधा ऑनलाईन माध्यमातून पोहचवण्यासाठी योजना आखली आहे, पण सदरील माध्यमातून सर्व सामान्य कामगारांना, बीडी कामगार, अशिक्षीत कामगारांना त्रास होतो आहे. तरी वसुली झालेली रक्कम त्वरित खात्यात जमा करण्या ची मागणी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा.अध्यक्ष अर्जुन चव्हाण व ऊमेश विस्वाद यांनी पीएफ कार्यांलय गोळीबार मैदान येथे झालेल्या निदर्शनास मार्गदर्शन करताना केले

. ठाकुर सावदेकर आणि कंपनी च्या दि 28 जुन 2023 रोजी 7 ऐ नुसार 17,33, 107 रू चा आदेश पारित करुन कामगारांना देण्यासाठी आदेश दिले होते, त्यानुसार व्यवस्थापनाने सदरील रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालय पुणे येथे जमा केलेली आहे या बाबतीत भविष्य निर्वाह निधी कार्यालय व्दारे कामगारांना त्वरित रक्कम मिळणे आवश्यक होते, पण या बाबतीत संघटनेने पाठपुरावा केला असता पी एफ कार्यालया कडून उडवा उडवी ची उत्तरं दिली जातात तसेच पीएफ ची खाते कोण काढणार या बाबतीत कंपनी व पी एफ कार्यालय व ठाकुर सावदेकर आणि कंपनी एकमेकांच्यावर ढकलण्याचे काम चालू आहे त्यामुळे वसुली होवून ही कामगारांना मिळालेला नाही त्यामुळे कामगारांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. तरी या बाबतीत त्वरीत कारवाई करून कामगारांना भविष्य निर्वाह निधी रक्कम खात्यात त्वरित जमा करावी , तसेच येथे काम करत असलेल्या कामगारांना वजावट

केलेल्या जुन 2022 पासून आत्तापर्यंत अंशदान रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालय येथे जमा करावी, अशी मागणी चे निवेदन भविष्य निर्वाह निधी कार्यालय पुणे यांच्या वतीने क्षेत्रीय पीएफ आयुक्त योगेद्र सिंग शेखावत यांनी स्विकारून 5 दिवसांत कारवाई करून कामगारांना न्याय देण्यात येईल असे आस्वासन भारतीय मजदूर संघ शिष्टमंडळाला दिले


या वेळी शिष्टमंडळात भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, ऊमेश विस्वाद व विजया झंपाल, पार्वती अंकम, वैशाली शिक्रापूर,संजना भुसा , कविता सुरम , शिरापुरी यांनी नेतृत्व केले. कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button