सातेवाडी परिसरात नवप्रभात दूध संकलन सुरू

व्यवसायातून समृद्धी कडे वाटचाल करावी – केशव बुळे
कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील सातेवाडी येथे आज बुधवार दिनांक 19 12 2022 रोजी सातेवाडी बाजार तळ येथे परिसरातील लोकांच्या सेवेमध्ये नवप्रभात दूध डेरी संकलन केंद्र ची सुरवात करण्यात आली
.सातेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच केशव गोविंद बुळे यांचे हस्ते या नवप्रभात दूध संकलन केंद्राचे उदघाटन करण्यात आले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील जेष्ठ नागरिक तरुण वर्ग उपस्थित होते
आमदार किरण लहामटे यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते डॉ दत्तात्रय लहामटे व नवप्रभात दूध डेरी चे अधिकारी श्री मुंढे साहेब, सरपंच केशव बुळे , सदस्य ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व फीत कापून नवप्रभादूत संकलन केंद्र सातेवाडी व परिसर यांच्यासाठी सुरू करण्यात आले. डॉक्टर दत्तात्रय लहामटे ,नव प्रभात चे अधिकारी मुंडे साहेब यांनी यावेळी दूध व्यवसाय बाबतीत मार्गदर्शन केले

पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी नवप्रभात दूध संकलन केंद्रामध्ये दूध जमा करावे असें सांगत शेतकऱ्यांनी व्यवसायातून समृद्धीकडे वाटचाल करावी असे आवाहन सरपंच केशव बुळे यांनी यावेळी केले