संगमनेर येथे मेडीकव्हर हॉस्पिटल मधे आई आणि बाळाची काळजी घेणाऱ्या स्वतंत्र युनिटचा शुभारंभ

संजय साबळे
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर येथे मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये आई आणि बाळाची काळजी घेणाऱ्या स्वतंत्र युनिटचा शुभारंभ आज झाला आहे .यासाठी पूर्णवेळ बालरोग तज्ञ म्हणून डॉ. सुजित मुळे नवजात शिशु व बालरोगतज्ञ म्हणून रुजू झाले असून त्यांचा सहा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे.या युनिट साठी लागणारे अत्याधुनिक सुविधांमध्ये NICU तसेच PICU सुसज्ज करण्यात आले असून आधुनिक व्हेंटिलेटर,वार्मर,सी पॅप मशीन तसेच फोटो थेरपी,ऑक्सिजन थेरपी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
नवजात शिशु व बालकांची काळजी घेण्यासाठी डॉ. सुशील पारख वरिष्ठ बालरोगतज्ञ, डॉ.बाबुलाल अग्रवाल बालशल्य चिकित्सा तज्ञ,डॉ.सुनील दिघे बाल हृदयरोग तज्ञ, डॉ. संदीप बोरले आणि डॉ. निखिल छल्लावार बाल अस्थीरोग तज्ञ, डॉ.सुप्रिया तोरकडी बाल नेत्ररोग तज्ञ इत्यादी डॉक्टरांची संपूर्ण टीम सदैव उपल्ब्ध आहे.
पूर्णपणे आई आणि बाळाची काळजी घेणाऱ्या युनिट चे उदघाटन डॉ.सुधीर तांबे माजी आमदार तसेच डॉ.जयश्री थोरात अध्यक्ष एकविरा फाउंडेशन,सौ.दुर्गाताई तांबे माजी नगराध्यक्षा यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी बोलताना डॉ.सुधीर तांबे म्हणाले की खूप वेळा लहान बाळांना घेऊन नाशिक किंवा पुणे येथे जावे लागत होते परंतु ती सुविधा आता मेडिकव्हर हॉस्पिटल ने संगमनेर मध्ये सुरुवात केल्यामुळे आता कुणालाही धावपळ करत बालकांना घेऊन नाशिक किंवा पुणे जावे लागणार नाही.
डॉ.जयश्री थोरात यांनी आपत्कालीन परिस्थितीत आता नवजात बालकांची काळजी संगमनेर मध्येच घेतली जाईल याबद्दल मेडिकव्हर चे आभार मानले.
सौ दुर्गाताई तांबे यांनी मेडिकव्हर हॉस्पिटल ने प्रसुती विभागाबरोबर अत्याधुनिक सुरक्षित आणि सुलभ प्रसूतीची सुरवात केल्याबद्दल आभार मानले.
याप्रसंगी श्री.सचिन बोरसे रीजनल हेड मेडिकव्हर हॉस्पिटल महाराष्ट्र, डॉ.सुशील पारख मेडिकल डायरेक्टर मेडिकव्हर हॉस्पिटल,डॉ.बाबुलाल अग्रवाल बालशल्य चिकित्सा तज्ञ, श्री.अनुप त्रिपाठी सेंटर हेड संगमनेर ,व श्री दिपक जाधव हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास संगमनेर मधील प्रथितयश बालरोग तज्ञ डॉ. ओमप्रकाश सिकची, डॉ.योगेश निघुते, डॉ.वरूण गिरी, डॉ. जयप्रकाश खैरनार,डॉ. अजय शिंदे ,डॉ. प्रमोद हासे यांनी उपस्थिती राहून आभार मानले.
यासह डॉ.संकेत मेहता, निमाचे अध्यक्ष डॉ. सुभाष मंडलिक ,बंडू क्षत्रिय,कपिल टाक ,योगेशजी कासट,महेश सारडा याही पाहुण्यांची उपस्थिती लाभली.
मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉ. एकता डेरे-वाबळे स्री-रोग तज्ञ,डॉ.शांताराम निघूते,डॉ. जगदीश वाबळे यांनी शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर मेडिकव्हर हॉस्पिटल चे डॉ.सुशांत गिते, डॉ. योगेश तोरकडी,डॉ. प्रमोद गांगुर्डे ,डॉ.तुषार खेडूलकर,श्री योगेश चौधरी ,डॉ. केतकी बंदावणे श्री जितेंद्र जोशी ,श्री.श्रीकृष्ण चंदनकर,श्री गंगाधर गिते आणि मेडिकव्हर हॉस्पिटलचे पूर्ण कर्मचारी उपस्थित होते