उत्तर नगर जिल्हा शिवसेना सह संपर्कप्रमुख पदी सौ अनिताताई जगताप यांची नियुक्ती.

संजय महाजन
शिर्डी प्रतिनिधी
शिर्डीच्या शिवसेनेच्या प्रथम मा.नगराध्यक्षा सौ अनिताताई विजय जगताप यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघ व उत्तर नगर जिल्ह्याच्या सह संपर्कप्रमुख पदी राज्याचे मुख्यमंत्री .ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली.
मागील काळातील शिवसेना पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा प्रमुखपदी काम करीत असतांना संघटन कौशल्य व पक्ष वाढीसाठी अहोरात्र घेतलेले कष्ट या व अधिक कामांची दखल घेऊन खा. श्रीकांत शिंदे,सचिव श्री भाऊसाहेब चौधरी, पक्ष निरीक्षक श्री राजेंद्र चौधरी यांचे शिफारशीवरून सौ अनिताताई जगताप यांना सह संपर्कप्रमुख पदी निवडण्यात आले.
सौ अनिताताई जगताप ह्या तळागाळातील नागरिकांचा दांडगा संपर्क ठेवून असतात. नगराध्यक्ष पद सांभाळताना शिर्डी शहरात अनेक विकासकामे केली. व जनतेचे प्रश्न सोडविले. त्याच्या कार्यकालात शिर्डी नगरपालिकेमध्ये सर्व प्रथम हळदी कुंकू समारंभ सुरू केला. नगरसेविका व नगराध्यक्षा होण्याअगोदर छत्रपती मित्र मंडळ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सार्वजनिक श्री गणेशोत्सव , श्री नवरात्र उत्सव, श्री शिवजयंती उत्सव , व्यापक स्वरुपात हळदी कुंकू तसेच महिलांसंदर्भात अनेक कार्यक्रम राबवित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी विलंबामुळे शिर्डी नगरपालिकेमध्ये उदासीन वातावरण निर्माण झाले आहे. प्रायोजित सर्व कामांना कात्री लागली गेली आहे. परंतु छत्रपती मित्र मंडळाचे माध्यामातून महिलांचे सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक दृष्ट्या सबलीकरण संदर्भात सर्व कामे सौ अनिताताई जगताप वर्षानुवर्ष करीत आहेत.
जिल्हा प्रमुख असताना सहा तालुक्याचे कामकाज पक्ष वाढीसाठी तसेच महिलांच्या सर्व प्रश्नासंदर्भात जुना अनुभव नक्कीच फलदाई ठरेल यात शंका नाही. अशा एक ना अनेक कामांची पावती म्हणुन सौ अनिताताई जगताप यांना नुकताच प्रहार वृत्त समूहाचे वतीने राज्यस्तरीय जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच लायन्स , लॉयनेस क्लब, तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगराध्यक्षा काळात महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ शिर्डी-सुंदर शिर्डी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात छत्रपती मित्र मंडळ आयोजित श्री गणेशोत्सव काळात राज्याचे महसूल व पालक मंत्री व छत्रपती मित्र मंडळ व श्री विजयराव जगताप पा. परिवारावर विशेष स्नेह असणारे मा.नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील उपस्थित नागरिक व महिलांशी संवाद साधत असतांना संघटना व जगताप पाटील परिवार याचे सोबत गेल्या वीस बावीस वर्षापासुन स्नेहाचे संबंध आहेत़. अशा अनेक जुन्या आठवणी व कार्यकर्त्यांच्या नामोल्लेख करीत आठवणीना उजाळा दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांना लाभ मिळाला नसेल त्यांना लवकरच लाभ मिळेल अशी ग्वाही दिली. या संदर्भात सौ अनिताताई जगताप आपणांस योग्य ते मार्गदर्शन करतील असे नामदार श्री विखे पाटलांनी उपस्थित महिलांना सांगितले.
शिवसेना पक्षाच्या वतीने निवड झाल्याने सह संपर्कप्रमुख सौ अनिताताई विजय जगताप पा.यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.नामदार एकनाथ शिंदे साहेब तसेच खासदार श्रीकांत शिंदे, सचिव श्री भाऊसाहेब चौधरी, पक्ष निरीक्षक मा.श्री राजेंद्र चौधरी यांचे आभार मानले. तसेच पक्षवाढीसाठी व महिलांच्या सर्व प्रश्नाबाबत दिलेल्या संधीचे सोने करून दाखवू असा निर्धार सौ अनिताताई जगताप यांनी व्यक्त केला.
सौ अनिताताई जगताप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघच्या शिवसेना पक्षाच्या सह संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीरामपूरचे माजी आमदार श्री भाऊसाहेब कांबळे. तसेच जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र देवकर पा. जिल्हा संघटक श्री विजयराव काळे पा.महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ सुनीताताई शेळके ,राहाता तालुका प्रमुख सौ अर्चनाताई निभे, उपप्रमुख सुकेशनी गायके,कोपरगाव तालुका प्रमुख सौ मीनाक्षीताई वाकचौरे ,उपप्रमुख आरती गाढे, कोपरगाव तालुकाध्यक्ष रावसाहेब थोरात, विशाल शिरसाठ उपजिल्हाप्रमुख युवासेना
बाबासाहेब भालेराव मागासवर्गीय सेल तालुकाप्रमुख राजश्रीताई ओवाळसाधनताई प्रभू स्वतिताई कोळ्गे कविता वाघ सुरय्या शेख, सुरेखा गव्हाणे ताई मुंबई संपर्कप्रमुख, शहर प्रमुख सौ विजया धोंड,कोल्हार शहर प्रमुख सौ पुजाताई सोमवंशी व महिला आघाडीच्या असंख्य महिलांनी सौ जगताप ताईचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.