अगस्तीचा बिगुल अखेर वाजला! अकोल्यात सहकारातील राजकीय रणधुमाळी सुरू!

सुनील गीते
अकोले दि १३
अकोल्याची कामधेनू असणाऱ्या अगस्ति सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे
प्रादेशिक सह संचालक (साखर)अहमदनगर श्री मिलिंद भालेराव व निवडणूक निर्णय अधिकारी जी जी पुरी यांनी आज अगस्तीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला अगस्तीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने सहकारातील राजकीय रणधुमाळी आता तालुक्यात सुरू होणार आहे गेल्या काही दिवसां पासून सुरू असणारा अगस्ती चा राजकीय बॉयलर पुन्हा पेटणार आहे
संचालक मंडळासाठी १७ जुलै२०२२ रोजी मतदान घेण्यात येणार आहे व त्यांतर १८ जुलै२०२२ रोजी मतमोजणी होणार आहे
यापूर्वी अगस्ती मध्ये एकूण १९ संचालक होते. आता या वेळी च्या निवडनुकीत २१ संचालक निवडून देण्यात येणार आहे
कोतूळ व देवठाण गटातून २ संचालकांची वाढ झाल्याने आता एकूण सदस्य संख्या २१ झाली आहे.
एकूण ५ गटातून ही निवडणूक होईल. पैकी
अकोले गटातील १० गावांत १२०१, इंदोरी गटात ३०गावांतून १८७६ मतदार, आगर गटातील ३० गावांतून १९२८मतदार, कोतूळ गटातून ६० गावे १९९६ मतदार
देवठाण गटात २५ गावे असून १३४१ मतदार आहेत असे पाच गटात एकूण ८३४२ऊस उत्पादक सभासद मतदार आहेत
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या एकूण ८ हजार ३४२ सभासद मतदार म्हणून पात्र ठरले आहेत. यात सुमारे ३३०० आदिवासी शेतकरी सभासद मतदार असून उर्वरीत बिगर आदिवासी ऊस उत्पादक सभासद आहेत. पूर्वी सभासद संख्या ३२ हजारांहून अधिक होती. पण या निवडणुकीत सभासद संख्या बऱ्याच पटीने कमी झाली आहे
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत १४ ते २० जूनपर्यंत राहणार असून २१ जून रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी तर, २२ जूनला सकाळी ११ वाजता पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी माघारीसाठी २२ जून ते ६ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर ७ जुलैला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास १७जुलैला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेऊन १८ जुलैला सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू करून मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे.
अकोले तालुक्यात एकूण १९३ महसुली गावे आहेत, पैकी १५५ गावातूनच अगस्ति कारखान्याचे ८३४२ मतदार सभासद आहेत. अगस्ति साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रातअकोले, इंदोरी, आगार, कोतूळ, देवठाण असे ५ गट आहेत. सर्वाधिक गावे कोतूळ गटात ६० तर इंदोरी व आगर गटात प्रत्येकी ३० गावे आहेत. देवठाण गटात २५ व सर्वांत कमीअकोले गटात १० गावे आहेत. उत्पादक पाच गटातून प्रत्येकी तीन असे १५ संचालक पाठवायचे आहेत.
सोसायटी व संस्था मतदार संघ, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ, भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदार संघ, इतर मागास प्रवर्ग यातून प्रत्येकी १ व महिला राखीव मतदारसंघातून २ असे एकूण ६ संचालक निवडून द्यायचे आहेत.अगस्ती कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याने अकोल्यात आता सहकाराचा राजकीय आखाडा आगामी काळात पहावयास मिळणार आहे इच्छुकांनी आपल्या आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे गटनिहाय उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे