
कोतुळ प्रतिनिधी
राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या कोतूळ येथील कोतुळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून अल्ताब शेख यांनी तर सहायक म्हणून दादाभाउ साबळे यांनी काम पाहिले
या निवडणुकीत कोतुळेश्वर शेतकरी विकास मंडळाचा दणदणीत विजय झाला
कोतुळे शवर शेतकरी विकास मंडळाने सर्व १५ जागा जिंकत शेतकरी विकास मंडळा चा दारुण पराभव केला
भटक्या विमुक्त जमाती मतदार संघातील एक जागा बिनविरोध झाली होती या जागेवर चंदू नाना पवार यापूर्वी बिनविरोध निवडून आले उर्वरित 14 जागांसाठी मतदान झाले कोतुळेश्वर शेतकरी विकास मंडळ आणि शेतकरी विकास मंडळ अशा दोन गटात सरळ लढत झाली
दोन्ही गटांनी आपला प्रचाराचा नारळ कोतुळेश्वर देवस्थान येथे फोडून प्रचाराचा शुभारंभ केला यामुळे कोतुळेश्वर कोणत्या गटाला पावतो याकडे लक्ष लागले होते अखेर कोतुळेश्वर शेतकरी विकास मंडळाला कोतुळे श्वर पावला

कोतुळेशवर शेतकरी विकास मंडळाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
आदिवासी कर्जदार मतदार संघात
गोडे गेनू भिकाजी (431) गोडे विशाल नामदेव (444) लेंभे बाळासाहेब लक्ष्मण( 451) लेंभे संदीप रघुनाथ (451) वायाळ चंदन गणपत( 385 )शेळके भागा गंगाराम (417)
पराभूत उमेदवार- गोडे भीमा शंकर (382) घिगे कुंडलिक बुधाजी (318) धराडे अरुण विष्णू (367 )धराडे राजाराम तुकाराम (322) धिंदळे अमृता भाऊराव (326 ) वायाळ काशिनाथ धोंडीबा (259)
सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघात
विजयी उमेदवार-
जाधव रघुनाथ गेणु (396) देशमुख मनोज शिवनाथ (444) देशमुख सयाजी मुरलीधर (527) पोखरकर निवृत्ती सखाराम (398)
पराभूत उमेदवार-
घोरपडे सोमनाथ रावजी (303) देशमाने दत्तात्रय भाऊ (372) देशमुख बाळासाहेब जानकीराम (369) भाऊसाहेब रघुनाथ देशमुख (282)

महिला राखीव मतदार संघात
विजयी उमेदवार
गोडे उषा नामदेव (506) बांबळे सुनंदा नामदेव (463)
पराभूत उमेदवार- लहामटे जिजाबाई किसन (337) लहामटें सीताबाई निवृत्ती (333)
इतर मागास वर्गीय मतदार संघात
बेळे बाळासाहेब संपत हे (417) मताने विजयी झाले तर बाळासाहेब तुकाराम भुजबळ यांना 404 मध्ये मिळाले
कोतुळ सोसायटी हि तालुक्यातील अग्रेसर सहकारी संस्था आहे या संस्थेच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून होते निवडणुकीत सोसायटी निवडणुकीत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सयाजीराव मुरली अण्णा देशमुख सर्वधिक 527 मतांनी निवडून आले निवडणुकीनंतर मतदानानंतर कोतुळेश्वर शेतकरी विकास मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला