आजचे पंचांग व राशिभविष्य दि १४/०६/२०२२

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २४ शके १९४४
दिनांक = १४/०६/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
संताप आवरावा लागेल. काही कामांवर तुमच्या मनस्थितीचा परिणाम होऊ शकतो. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक यात्रेचा बेत आखाल. प्रयत्नात कसूर करू नका.
वृषभ
नवीन काम सुरुवात करताना सावध रहा. जबाबदारीची जाणीव ठेवाल. कामाचा भर वाढू शकतो. अतिश्रमाने थकवा जाणवेल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल.
मिथुन
दिवस मजेत घालवाल. मित्रांसोबत प्रवास कराल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरात अधिक वेळ रमाल. भोजनात आवडीचे पदार्थ खाल.
कर्क
दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. इतरांपेक्षा स्वत:च्या इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. झोपेची तक्रार जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
सिंह
मनाची चलबिचलता जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया जाईल. आपली तांत्रिक बाजू भक्कम करावी. हातापायाला किरकोळ इजा संभवते. उगाचच काळजी करत बसून राहू नका.
कन्या
चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते. स्वकीयांचे गैरसमज दूर करावेत. नाहक खर्च होऊ शकतो.
तूळ
भावंडांशी संबंध सुधारतील. घराविषयी काही महत्त्वाच्या चर्चा होतील. अचानक धनलाभ संभवतो. नवीन कामाला चांगली सुरुवात होईल. कामाची गतीमानता वाढेल.
वृश्चिक
अनाठायी खर्चाला आवर घालावी. कौटुंबिक वादावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टीवरून चिडू नका. मनात नकारात्मक विचार आणू नका.
धनू
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनात कसलाही गैरसमज आणू नका. कौटुंबिक वाद शांततेने हाताळा. कष्ट करूनच यश हातात पडेल. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे॰
मकर
शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. जोडीदाराशी मनमोकळा प्रेमालाप कराल. भागीदाराशी संबंध सुधारतील. संपर्कातील लोकात वाढ होईल. जवळच्या लोकांच्या भेटी घेता येतील.
कुंभ
नवीन कामातून समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्या शब्दांना चांगली धार येईल. विचारपूर्वक बोलावे लागेल.
मीन
दिवस चांगला जाईल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. हातातील काम पूर्ण होईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांचे सौख्य लाभेल.
🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठा २४ शके १९४४
दिनांक :- १४/०६/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०५,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति १७:२२,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति १८:३२,
योग :- साध्य समाप्ति ०९:४०, शुभ २९:२८,
करण :- विष्टि समाप्ति ०७:१४, बालव २७:२७,
चंद्र राशि :- वृश्चिक,(१८:३२नं. धनु),
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – मृग,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०७नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:४७ ते ०५:२६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५१ ते १२:३० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३० ते ०२:०८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:४७ ते ०५:२६ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
वटपौर्णिमा, वृषभपूजन, कारहुणवी, कुलधर्म, मन्वादि, अन्वाधान, भद्रा ०७:१४ प.,
————–
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर