डॉ सुनील साबळे यांचे निधन

अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील अंभोळ येथील रहिवासी असलेले व संगमनेर येथे कार्यरत असलेले डॉ.सुनील यशवंत साबळे यांचे दि.8 जून 2022 रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले
ते 53 वर्षाचे होते.अतिशय मनमिळावू,सर्वांशी सुपरिचित असलेले डॉ.सुनील साबळे यांनी अल्पावधीत संगमनेर येथे वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावले.सेवा भावी वृत्तीने त्यांनी रुग्णांची सेवा केली.त्यांच्यावर अंभोळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर अकोले संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली होती.
त्यांच्या पश्चात्य पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,तीन भाऊ, भावजया,एक बहीण,चार पुतणे एक नातू असा मोठा परिवार आहे. आय.टी आय.अकोले चे सेवानिवृत्त शिक्षक भरत साबळे सर यांचे ते लहान बंधू होते.
Hello there! I just wish to give you a huge thumbs up for your excellent information you’ve
got right here on this post. I’ll be returning to your web site for more soon.