इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १५/०६/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठा २५ शके १९४४
दिनांक :- १५/०६/२०२२,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०५,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति १३:३२,
नक्षत्र :- मूळ समाप्ति १५:३३,
योग :- शुक्ल समाप्ति २५:१४,
करण :- तैतिल समाप्ति २३:३८,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ(१२:०३नं. मिथुन) – मृग,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:३० ते ०२:०९ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०५:५४ ते ०७:३३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:३३ ते ०९:१२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५१ ते १२:३० पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:२६ ते ०७:०५ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
रवि मिथुन १२:०३, मु. ३० साम्यार्घ, पुण्यकाल १२:०३ ते १८:२७, इष्टि, यमघंट १५:३३ प., प्रतिपदा-व्दितीया श्राद्ध,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २५ शके १९४४
दिनांक = १५/०६/२०२२
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. दिवस फारसा अनुकूल नाही. अधिक मेहनतीची गरज भासेल. कामाचे योग्य नियोजन करा.

वृषभ
वायफळ गोष्टींपासून दूर रहा. फक्त आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करावे. मैत्रीत सलोखा ठेवावा. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. सकारात्मक विचार करावेत.

मिथुन
नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. काम वेळेवर पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. अतिघाई करून चालणार नाही. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा लागेल. अचानक आलेल्या समस्येतून मार्ग निघेल.

कर्क
विचारांना योग्य दिशा द्यावी. कोणत्याही गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाहीत. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.

सिंह
आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभेल. मैत्रीचे नवीन संबंध प्रस्थापित होतील. इतरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला चांगल्या बातमीची प्रतीक्षा राहील.

कन्या
आर्थिक लाभाबाबत सतर्क राहावे. मानभंगाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराचा तुमच्यावर वचक राहील. डोक्यात काहीसा गोंधळ चालू राहील. सरकारी कामे अडकून पडू शकतात.

तूळ
महत्त्वपूर्ण लोकांशी ताळमेळ जुळून येईल. आर्थिक स्थितीचा विचार कराल. नवीन जबाबदारी सामोरी येईल. चांगल्या गुंतवणुकीला वाव आहे. दिवसभर कामात व्यग्र राहाल.

वृश्चिक
काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. मुलांची काळजी लागून राहील. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. पारमार्थिक कामात सहकार्य कराल.

धनू
फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. नवीन लोकांसोबत चर्चा कराल. भावनांवर संयम ठेवावा. घरातील वातावरण शांततामय ठेवावे. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा.

मकर
चिकाटी सोडून चालणार नाही. जवळच्या प्रवासात अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. काही गोष्टीत धीर धरावा लागेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

कुंभ
हाताखालील लोकांवर लक्ष ठेवा. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. मनातील संकोच काढून टाकावा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मीन
अतिघाई त्रासदायक ठरू शकेल. आपल्या अपेक्षा संतुलित ठेवा. क्षुल्लक कारणावरून चिडचिड करणे टाळा. जवळचे मित्र मदत करतील. घरगुती कामात अधिक लक्ष घालावे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button