इतर

अकोले विधानसभा मतदारसंघात,मतमोजणी साठी प्रशासन सज्ज!

अकोले, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. अकोले तहसील कार्यालय सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असंल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी सांगितले.

मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरूवात होणार आहे. अकोले तालुका मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री.हौलीनलाल गौईटे (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनवरील मतमोजणीसाठी १४ टेबल, पोस्टल बॅलेटसाठी ७ व ई- पोस्टल बॅलेटसाठी २ टेबल लावण्यात येणार आहेत. प्रत्येक टेबलवर १ सूक्ष्म निरीक्षक, १ पर्यवेक्षक व १ सहायक असे एकूण १६१ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

तहसील सभागृहाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारातून मतमोजणी कर्मचारी व ईव्हीएम आणणे व घेऊन जाण्यासाठी निश्चित केले असून पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना प्रवेश निश्चित केला आहे. मिडिया सेलची व्यवस्था तहसील कार्यालय इमारतीच्या खाली पश्चिमेकडे करण्यात आली आहे. २०० मीटरच्या आत अधिकृत व्यक्तीं व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही उमेदवार डॉ. किरण लहामटे यांचे समर्थक यांना पोलीस मैदान, उमेदवार अमित भांगरे यांचे समर्थक यांना बाजारतळ तसेच इतर अधिकृत पक्ष व अपक्ष यांना अगस्ती विद्यालय येथे थांबण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.मतमोजणी प्रक्रिया अतिशय पारदर्शक वातावरणात पार पडणार असल्याचेही श्री.यादव यांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button