
,
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात दर वर्षी प्रमाणे या वर्षी बालदिंडीचे आयोजन करण्यात आले. बाल वारकरी दिंडीत उत्साहात सहभाग झाले. यात मुलींनी नऊवारी साड्या, दागिने, कळस घेऊन तर मुलांनी धोतर नेसून हातात वीणा, टाळ, मृदुंग असा वारकरी पेहराव करून आनंदाने नाचत होते. मुलांनी रिंगण, फुगडी, लेझिम, अभंग. पावली या क्रिया उत्साहात पार पाडल्या. विद्यार्थ्यांना बालपणात आध्यात्मिक आवड निर्माण व्हावी व आपली अध्यात्मिक संस्कृती त्यांना माहीत व्हावी या उद्देशाने दरवर्षी या बालदिंडीचे आयोजन करण्यात येतेअसे प्राचार्या सौ. उषा दळवी यांनी सांगितले,
यावेळी गावातील ग्रामस्थांनी मुलांना खाऊवाटप केला,कार्यक्रम यशस्वितेसाठी गागरे प्रीती मॅडम , प्राजक्ता रोहोकले ,सोनाली मॅडम, जया शिंदे, खैरे सर, गणेश सर, सुडके सर, निवडुंगे बाळासाहेब, डेरे बबन, आदींनी परिश्रम घेतले.