महाराष्ट्र

नवीन व्हिजन घेऊन चालले तर महाराष्ट्र
सुखी, समृद्ध होईल नितीन गडकरी

अकोले प्रतिनिधी
येणाऱ्या काळात शेतकरी हा अन्नदाता
नव्हे तर उर्जादाता बनला पाहिजे. नवीन व्हिजन घेऊन चालले तर महाराष्ट्र सुखी, समृद्ध होईल असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले ते अकोले येथे एका कार्यक्रमात बोलत होते

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या ८९
व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अकोल्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे, आ. मोनिका राजळे,
माजी आ. वैभवराव पिचड, स्नेहलता कोल्हे,
बाळासाहेब मुरकुटे, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे विभागीय संघटन मंत्री श्रीअनासपुरे,
भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर,
सरचिटणीस नितीन दिनकर, सौ. हेमलता पिचड,
शिवाजीराव धुमाळ,भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी,आशा बुचके, जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे,अमृतसागर दूध संघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, माजी जि. प. उपाध्यक्ष सिताराम देशमुख, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, महिला
तालुकाध्यक्ष रेषमा गोडसे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अरुण शेळके, कैलास जाधव, सोमनाथ मंगाळ,संदीप शेटे, भाऊसाहेब वाकचौरे, धनंजय संत शंभू नेहे, यशवंत आभाळे, राजेंद्र
डावरे, उद्योजक नितीन गोडसे, राजेंद्र गोडसे,
चंद्रकांत घुले, नगरसेवक शरद नवले,
आदींसह अकोले तालुक्यातील आढळा,
प्रवरा, मुळा व पठार भागातील कार्यकर्ते, व
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मधुकरराव पिचड यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
यावेळी कळसुबाईचा शिखर यात्री ५० वर्षांचे
विकासपर्व वा विशेषांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ना. नितीन गडकरी म्हणाले, देशात साखरेचे
प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. ऊस
हे हमखास नफा देणारे पीक आहे. त्यामुळे
शेतकयांचा या पिकाकडे कल वाढला आहे.
त्यामुळे साखर कारखान्यांनी साखरेपासून
इथेनॉल तयार करावे. इथेनॉल निर्मिती केली तरच
साखर कारखाने टिकतील. पुढच्या महिन्यापासून
फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या स्कुटर, रिक्षा,
ट्रक बाजारात येणार आहेत. या संपूर्ण इथेनॉलवर चालू शकतील अथवा इथेनॉल व पेट्रोलच्या मिश्रणावर चालतील. इथेनॉलची
किंमत पेट्रोलच्या निम्मी आहे. शिवाय दोन्ही
इंधनातून वाहनांना सारखेच अॅव्हरेज मिळेल.
इथेनॉलमधून प्रदुषण होणार नाही. त्यामुळे
इथेनॉलची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार
आहे. त्यामुळे मी अहमदनगर जिल्ह्याला इथेनॉल
पेट्रोल पंप मिळवून देतो. अहमदनगर जिल्ह्यातून
पेट्रोल-डिझेल हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी
केले.
भारतात शेतीसाठी पोटेशियम खतांची मागणी आहे. त्यासाठीआवश्यक पोटॅश आपल्याला आयात करावे लागते. इथेनॉल तयार करताना स्पेंटवॉश हे बॉयलरमध्ये जाळल्यावर पोटॅश निघते. हे साखर कारखान्यांत तयार होणारे पोटॅशही सरकार ३० ते ३२ रुपयांना विकत घेईल. त्यातून कारखान्यांचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकर्यांच्या इथेनॉलवर वाहने चालतील. इथेनॉल
ग्रीन फ्युएल आहे. त्यामुळे प्रदुषणापासून मुक्ती
मिळेल. आदिवासी भागात तांदूळ
पिकतो. त्यातून बायो सीएनजी, बायो एलएनजी
तयार करता येतो. माझा ट्रॅक्टर बायो सीएनजीवर
चालतो. नवीन व्हिजन घेऊन चालले तर महाराष्ट्र
सुखी, समृद्ध होईल असे नितीन गडकरी म्हणाले

यावेळी , मधुकरराव पिचड आमदार राधाकृष्ण विखे शिवाजी धुमाळ आदिनी मनोगत व्यक्त केले

. स्वागत व प्रास्ताविक माजी आमदार. वैभवराव पिचड यांनी केले सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे यांनीआभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button