पारनेर तहसिलदारांची खुर्ची पुढारी चालवतात काय ?

-मनसे उपादयक्ष अविनाश पवार
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यात राजकारणाची पातळी एवढी खाली जाईल असे कधीच वाटलं नव्हतं पण ह्या महाविकास आघाडी सरकारचा पारनेर तालुक्यातील आपसातला सावळा गोंधळ सेटलमेंट युती करून तालुक्यातील सर्व सामान्य गोरगरीब जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार आहे यांच्या आपसातील मत भेदामुळे लोकांना चुकीची माहिती तालुक्यातील यांच्याच बगलबच्च्यांनी पुरविल्यामुळे जेष्ठ नागरिकांची ससेहोलपट होत आहे ही थांबायला हवी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर चा जाहिर आरोप आहे की प्रशासनाच्या कामात राजकीय लोकांचा हस्तक्षेप झाल्यामुळे हा गोंधळ जाणुन बुजुन तयार करण्यात आला आहे आपल राजकारण जरुर करा पण नागरिकांन मध्ये संभ्रम निर्माण का करत आहात
मा.जिल्हा अधिकारी अहमदनगर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की फक्त हयातीचा दाखल ग्रामपंचायत कार्यालयातुन काढुन योजनेच्या लाभार्थीचे ज्या बँकेमध्ये खाते आहे तेथे ते जमा करावे व बॅंकेने तो दाखला संजय गांधी निराधार योजना तहसील कार्यालयात जमा करावा असा स्पष्ट उल्लेख असतानः जेष्ठ नागरिकांना चुकीच्या पद्धतीने माहिती पुरवून गोधंळ निर्माण केला जात आहे हे चुकीचे आहे राज कारण जरुर करा पण कुठे करावं याचं भान असायला हवे तालुक्यातील गोरगरीब जनतेला कुठे कागदपत्रे गोळा करताना किंवा हयातीचा दाखल बॅकेत जमा करताना किंवा पारनेर तालुक्यातील कोणत्याही प्रशासकीय कार्यालयात कसलीही अडचण आलीच तर कृपया महाराष्ट्र नवनिर्माणसेना पारनेर च्या कोणत्याही पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान जेष्ठ नागरिकांना करण्यात आले वेळ प्रसंगी अविनाश पवार मनसे तालुका उप अध्यक्ष पारनेर 8975559167 यांनी आपला संपर्क क्रमांक देऊन नागरिकांना आधार देण्यासाठी वेळ प्रसंगी संघर्ष करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.