मंदिर ही दगडाची वास्तू न रहाता ती हिंदू समाजाची संस्कार केंद्र व्हावीत – भास्करगिरी महाराज

अकोले प्रतिनिधी
अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर, मथुरेचे श्रीकृष्ण मंदिर, वाराणसी येथील काशी विश्वेश्वराचे मंदिर, ही केवळ पूजा अर्चा करण्याची ठिकाणी नसून ती देशाच्या आत्मसन्मानाची व शौर्याची प्रतीके आहेत, मंदिर ही दगडाची वास्तू न रहाता ती हिंदू समाजाची संस्कार केंद्र व्हावीत असे प्रतिपादन देवगड येथील श्री दत्त देवस्थान चे प्रमुख महंत व विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक भास्करगिरी महाराज यांनी केले. गउबाई सिताराम गिते यांनी दान दिलेल्या जागेवर विश्व हिंदू परिषद अकोले प्रखंड च्या वतीने श्री इच्छामणी गणेश मंदिराच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार डॉ. किरण लहामटे, नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, धर्माचार्य संपर्कप्रमुख हभप माधव दास राठी महाराज, प्रांत सहमंत्री सतीश गोरडे,प्रांत मठ मंदिर प्रमुख मनोहर ओक, आदी व्यासपीठावर उपस्थित होते
यावेळी शंकर गायकर म्हणाले की नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेच्या विचाराने भारलेला जिल्हा आहे गणेश मंदिर भूमिपूजन झाल्याने व मंदिराची मुहर्तमेड लावल्याने आंतरिक भाव प्रगट झाला आहे. दादा वेदक म्हणाले हिंदू समाज संघटित होत असून तो परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. हा देश नररत्नांची भूमी असून मंदिरे ही शक्ती केंद्रे आहेत मंदिरातील संसार वर्गातून समाजसेवी व देशभक्तीचा दृष्टिकोन रुजवला जाईल, यावेळी हभप माधव दास राठी, आमदार किरण लहामटे यांची भाषणे झाली.
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या जन्मदिनां निमित्त त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर मंदिरासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्रदीप भाटे यांनी केले, तर सूत्रसंचालन ह भ प दिपक महाराज देशमुख यांनी केले आभार गोपाल राठी यांनी मानले यावेळी माजी आमदार वैभव पिचड, भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे,प्रा.सोपानराव देशमुख,डॉ.जयराम खंडेलवाल,परभत नाईकवाडी,सुनील दातीर,राजेंद्र गोडसे,के.डी.धुमाळ,महेश नवले,शिवाजी उद्वंत,किसन शेट लहामगे,अशोकराव सराफ,दत्ता नवले,सुशंत गजे,हेमंत दराडे,बाळासाहेब मुळे, अमृता नळकांडे,जनाशेट आहेर,शंभू नेहे,हभप.विवेक महराज केदार,राजेंद्र महाराज नवले,सोमनाथ महराज भोर,भगवान गिते,भाऊसाहेब नवले,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदास सोनवणे,सुनील गिते,सचिन माताडे,राहुल ढोक,भारत वाकचौरे,किशोर टेके,सतीष नवले,महेश नवले,विनायक साबळे,सुरेश साबळे,अरुण पानगव्हाणे,आण्णासाहेब साबळे,संगीता जाधव,विंजय भुजबळ,शिवाजी नवले,योगेश भुजबळ, कारभारी घोलप, यांनी विशेष प्रयत्न केले.