आजचे पंचांग व राशिभविष्य दिनांक ०६/०४/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁 आजचे पंचांग 🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १६ शके १९४४
दिनांक :- ०६/०४/२०२२,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४३,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति १८:०२,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति १९:४०,
योग :- आयुष्मान समाप्ति ०८:३७,
करण :- कौलव समाप्ति –:–,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३२ ते ०२:०४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२१ ते ०७:५३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५३ ते ०९:२६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५९ ते १२:३२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:१० ते ०६:४३ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
कल्पादि, घबाड १९:४० नं., विष्णूचा दोलोत्सव, हयव्रत,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १६ शके १९४४
दिनांक = ०६/०४/२०२२
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
आवडी निवडीबद्दल दक्ष राहाल. कामाचा अतिरिक्त तान जाणवेल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. प्रेमळपणे सर्वांना जिंकून घ्याल. बोलण्यातून उत्तम छाप पाडाल.”
वृषभ
लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. सर्व गोष्टींत मनापासून रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
मिथुन
कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. काही गोष्टी उघडपणे बोलणे तळाल. आरोग्याची हयगय करू नका. नवीन मित्र जोडले जातील.
कर्क
तुमची समाजप्रियता वाढेल. सरकारी कामे पूर्ण होतील. स्त्री वर्गाशी मैत्री कराल. मित्रा परिवारात वाढ होईल. उत्तम व्यावसायिक कमाई करता येईल.
सिंह
तुमच्या कलेला योग्य प्रशस्ती मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. इतरांची मने जिंकून घ्याल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. दिवस भाग्यकारक ठरेल.
कन्या
धार्मिक वृत्तीत वाढ होईल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. छंद जोपासण्यात रमून जाल. नवीन विषयात रुची दाखवाल. हातून एखादे सत्कार्य घडेल.
तूळ
कमी श्रमात कामे पार पडतील. जोडीदाराचे कौतुक कराल. शेअर्समधून लाभ संभवतो. पैज जिंकता येईल. व्यावहारिक दृष्टीने विचार कराल.
वृश्चिक
वैवाहिक सौख्यात भर पडेल. तुमच्यातील अहंमन्यता वाढीस लागेल. एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत चांगला लाभ होईल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल.
धनू
नातेवाईकांची मदत घेता येईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. दिवस काहीसा आळसात जाईल. ऐषारामाच्या वस्तू खरेदी कराल. काटकसरी कडे लक्ष द्या.
मकर
रागावर नियंत्रण ठेवावे. रेस जुगार यांतून लाभ संभवतो. मैत्रीतील घनिष्टता वाढेल. प्रेम सौख्याला बहार येईल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील.
कुंभ
हातात नवीन अधिकार येतील. जवळच्या ठिकाणच्या प्रवासाचा योग येईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवस आनंदात जाईल. जवळचे मित्र भेटतील.
मीन
निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. हातातील कलेला वाव द्यावा. इतरांचे मनापासून कौतुक कराल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. हस्त कलेचा आनंद घ्याल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर