इतर

खासदार विखे यांना आमदार लंके यांच्यावर टिका करण्याचा अधिकार नाही ! – सौ.सुवर्णा धाडगे

कोरोना काळात बिळात लपून बसणाऱ्यांनी केलेली टीका हास्यास्पद !

रांजनगाव व उखलगावातील १०० एकर जमिन व त्यावर होणारा आपला तेलबिया प्रकल्प कुठे गेला ?

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
गेली ५० वर्ष आमच्या तालुक्याच्या जीवावर ज्यांनी सत्ता उपभोगली असे आपल्या सर्वांचे खासदार साहेब आपण आमच्या मतदार संघात काय भरीव काम केले ते आधी दाखवा ? मतदार संघासाठी गेले तीन वर्षात आपण काय भरीव काम केले ते दाखवा ? मगच आमदार निलेश लंके साहेबांवर टिका करा . कोरोना काळात त्या वेळेस भयानक परिस्थिती तालुक्यात ओढवली होती त्या वेळेस आपल्या जिवाची पर्वा न करता आमदार निलेश लंके हे दिवसातील 22 तास रुग्णांसमवेत राहून त्यांचे सुखदुःख जाणून घेत होते . त्यांना औषध उपचार असो , जेवण असो की त्यांच्या मनातील मरगळ झटकण्यासाठी ठेवलेले सांस्कृतिक कार्यक्रम असो त्यात व्यस्त असताना स्वतः डॉक्टरांच्या बरोबर राहून कोविड सेंटर मध्येच मुक्काम करत रुग्णांवर उपचार करण्याचा प्रयत्न करत होते . परंतु त्याच वेळेस आपण आणलेले रेमडीसेवर इंजेक्शन गोरगरीब जनतेस चढ्या दराने बाजारात विकत होतात . हे विसरू नका आसे खासदार सुजय विखे यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. सुवर्णाताई धाडगे यांनी केले आहे .


पारनेर तालुक्यात आपणालाही माहित आहे की मतदार संघात असे एकही गाव नाही की ज्या गावात आमदार साहेबांचे काम नाही. गेली ५० वर्ष तेच आश्वासन व निवडणूक आली तर पैशाच्या जोरावर मतमागणी करताय हे चाललय काय ? काही वर्षापुर्वी रांजणगाव मशिद गावा मध्ये तेलबिया प्रकल्पाच्या नावाखाली अतिशय अल्पदरात शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या १०० एकर जमिनीवर होणारा आपला तेलबिया प्रकल्प कुठे गेला ? तुमच्या तेलबिया प्रकल्पामुळे आजही उखलगाव रांजणगाव चे शेतकरी तुम्हाला देत आहेत . लोकनेत्यांचे नाव सातासमुद्रापार पोहोचले ते आपणास देखवत नाही . लोकप्रतिनिधीची तुम्हाला भिती वाटायला लागली म्हणून नैराश्यातुन आपन टिका करताय . जर पारनेरकरांनी ठरवले व आमदार निलेश लंके यांना लोकसभेला उभे केले तर बलाढ्य मतानी आपणास पराभव स्वीकारावा लागेल ? तुमच्या सारख्या घराणेशाहीच्या नव्हे तर सामान्य कुटुंबातला निलेश लंके सारखा तरुण 61 हजाराच्या मताधिक्याने आमदार झालेत म्हणुन आपल्या सारख्या घराणेशाही वाल्यांचा पोटशूळ उठलाय !
तुम्ही पारनेरकरांना म्हटलात की तुम्ही सर्वजण मोदी साहेबांमुळे कोरोनातून जिवंत राहिलात अहो खासदार साहेब पारनेरकरांसाठी कोरोना काळात खरे देवदूत आमचे आमदार साहेबच होते . २४ तास कोरोणाच्या महामारीत घरदार सोडून कोविड सेंटरमध्येच मुक्काम ठोकून होते .त्यावेळेस आपण कोणत्या बिळात लपून बसला होतात ? टाळया वाजवून थाळया वाजून आपन धंटानाद करत होते तेव्हा स्वतःला कोरणा रुग्णांच्या सानिध्यात राहून आमदार निलेश लंके रुग्णसेवा करत होते .
ज्यांच्या हंगा गावातील सेवा सोसायटी व ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होते . व मतदार संघात किमान 90 टक्के सोसायट्या राष्ट्रवादीच्या ताब्यात येतात त्या लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब यांच्यावर टीका करणाऱ्या खासदार विखे यांच्या नेतुत्वाची व घराणेशाहीची वाताहात होण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहेत . स्वतःच्या गावातील सोसायटी तेरा झिरो होती आपल्या विरोधात जाती . व हे महाशय महाराष्ट्रात मातब्बर व सामाजिक चेहरा म्हणून ओळख असणारे आपल्या लोकनेते आमदारांवर टीका करतात हे त्यांची बेताल वक्तव्याचा परिणाम येत्या लोकसभेलाही दिसून येणार आहे . स्वतःच्या गावातील जनतेने ही आपल्या कडे तोंड फिरवले आहे . आता तरी आपण शहाणे व्हावे .
२४ तास ३६५ दिवस जो माणूस ही काम करतो कोरोना काळात 36000 रुग्णांना जीवदान देत देशासह देशाबाहेर प्रसिद्धी मिळवणारे पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हेच आहेत . हे आपणास ज्ञात असतानाही भविष्यात निलेश लंके जिल्ह्याच्या राजकारणात आपणास डोईजड होत आहे . याची चाहूल आपणास लागल्यामुळे आपण हतबल झाले आहात .तेव्हा नैराश्यापोटी असे बेताल वक्तव्य करून आपले हसू करून घेऊ नका कारण आपल्या सारखे कुठलीही राजकीय पाठबळ व वारसा नसतानाही आमदार निलेश लंके हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 61 हजार इतक्या मताधिक्याने जनतेने निवडून दिले आहेत . तेंव्हा आपणास पारनेर तालुक्यात भवीष्यात राजकारण करावयाचे आसेल तर आमदार निलेश लंके साहेब यांच्याबद्दल थोडे जबाबदारीने बोलत जा ? आपण उपजत लक्ष्मीपुत्र आहात . पिढीजात घराणेशाहीचे आपण पाईक आहात . परंतु आमचे आमदार हे गरीब घराण्यातून उदयास आले आहेत व दीनदलित गोरगरीब जनतेची सेवा करत आहेत . आपण खासदार म्हणून नगर दक्षिणचे नेतृत्व करत आहे . परंतु गेल्या तीन वर्षात पारनेर मतदार संघात आपण किती कामे केलेत हे दाखवून द्या ? एक साधा आमदार असताना अडीच वर्षात प्रत्येक गावात किती लाखाचे कामे झालेत हे माहितीच्या अधिकाराखाली तुम्हीच माहिती काढा व जनतेची दिशाभूल करणे बंद करा असा सज्जड इशारा महिला तालुका अध्यक्ष सौ. सुवर्णा ताई धाडगे यांनी खासदार सुजय विखे यांना दिला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button