सिन्नर तालुक्यात मोह’च्या महिलांनी घेतले योगाचे धडे!

नाशिक प्रतिनिधी
आरोग्य विद्याधाम येथील योग शिक्षिका मेघा बोडके यांनी कोकण कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील एकूण ७ जिल्ह्यातील साधकांना दि. १ जून ते २१ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नियमित योग वर्ग घेतले. जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर मानवतेसाठी योग या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये कृषि विद्यापीठातील ४० ते ४५ योगसाधक तसेच नगर, सोलापूर, पुणे, मुंबई येथील १५ योगसाधक सहभागी होते.
योग दिनासाठी ग्रामीण भागात योगाचा प्रचार करण्यासाठी मेघा बोडके यांनी आरोग्य धाम, योग विद्यापीठाच्या प्रेरणेने मोह (ता. सिन्नर) येथेही मागील १ जून ते २१ जूनपर्यंत योगाचा वर्ग नियमितपणे घेतला याकरिता मोह चे सरपंच सुदाम सीताराम बोडके, प्रशासक सतीश पगार, पोलीस पाटील भाऊरराव काशिनाथ बिन्नर, गीते सर, लता कातकडे, चव्हाण, शिंदे, अमृतकर सर व हांडोरे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिक्षक म्हणून सौ. हर्षली जाघवार, दिपाली कदम आणि सौ. स्मिता गणोरे यांनी काम पहिले.

योग विद्यापीठाच्या सहकार्याने योग शिक्षिका मेघा बोडके यांच्या पुढाकाराने मोह (ता. सिन्नर) येथील गावकऱ्यांसाठी सलग २१ दिवस योग वर्ग घेण्यात आला. योगाचे धडे घेताना मोहच्या महिला.
