राशिभविष्य

आजचे पंचाग व राशिभविष्य दि. २३/०६/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ०२ शके १९४४
दिनांक :- २३/०६/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०७,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २१:४२,
नक्षत्र :- रेवती समाप्ति ०६:१४,
योग :- अतिगंड समाप्ति २८:५२,
करण :- वणिज समाप्ति ०९:०९,
चंद्र राशि :- मीन,(०६:१४नं. मेष),
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – आर्द्रा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०९प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०२:१० ते ०३:४९ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०५:५६ ते ०७:३५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३१ ते ०२:१० पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:१० ते ०३:४९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:२८ ते ०७:०७ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
घबाड ०६:१४ नं. २१:४२ प., भद्रा ०९:०९ नं. २१:४२ प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ०२ शके १९४४
दिनांक = २३/०६/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
भावनिक गोंधळ वाढवू नका. अचानक धनलाभाची शक्यता.  कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आज कामात फार मोठे बादल करू नका. उद्दीष्ट ठरवून ठेवा.

वृषभ
तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. व्यावसायिक अडचण दूर होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. संपर्कातून आठवणींना उजाळा द्याल.

मिथुन
कामातील दिरंगाई टाळावी. काही कामे चातुर्याने करावी लागतील. अतितत्परता दाखवू नका. वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवेल. हटवादीपणा करून चालणार नाही.

कर्क
प्रत्येक पाऊल घाईने टाकून चालणार नाही. मनातील इच्छेसाठी आग्रही राहाल. वरिष्ठांच्या रोषाला बळी पडू नका. थोडीफार कसरत करावी लागू शकते. घरात नातेवाईकांची ऊठबस राहील.

सिंह
स्वत:साठी थोडा वेळ काढावा. व्यावसायिक वाढीसाठी नवीन धोरण आखाल. जवळच्या लोकांच्या भेटीने खुश व्हाल. तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल. कामाव्यतिरिक्त इतर व्यापात गुंतून पडाल.

कन्या
कामात चातुर्य दाखवावे लागेल. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. छानछोकीवर खर्च करावा लागेल. दिवस भटकंतीत घालवाल. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल.

तूळ
मनोबल वाढवावे लागेल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

वृश्चिक
बौद्धिक क्षमतेचा कस लागू शकतो. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. हेकटपणे वागून चालणार नाही. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. आर्थिक व्यवहारात सजगता दाखवावी.

धनू
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मानसिक संतुलन ठेवावे लागेल. कौटुंबिक गोष्टी येणार्‍या वेळेवर सोडाव्या. संपर्कातील लोक भेटतील. मनाची द्विधावस्था दूर ठेवा.

मकर
सरळ मार्गी जमेल तेवढे करावे. मनातील इच्छेला प्राधान्य द्या. हातातील कामात यश येईल. नव्या उर्जेने कामे कराल. प्रेमप्रकरणाला उभारी मिळेल.

कुंभ
संमिश्रतेचा ताण कमी होईल. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक व्यवहारात सावध रहा. उत्तम वाहन सौख्य मिळेल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल.

मीन
तुमची कार्यप्रवीणता वाढेल. जोमाने नवीन काम हातात घ्याल. परोपकाराची भावना जागृत ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवा. श्रम व दगदग वाढेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button