महाराष्ट्र

निघोज येथील चैतन्य कानिफनाथ दिंडी सोहळ्याचे अविरत २१ वर्ष


दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी:-

अठरा पगड जातीचे वारकरी पण कधी वाद नाही लाखो वारकऱ्यांचा सोहळा पण कधी उपाशी नाही नव्वद वर्षांहून पण चालण्याचा कसलाही त्रास नाही उन वारा पाऊसच सामना पण कसलीही चिंता नाही एकवीस दिवस घरच्यांचा त्याग आहे पण घरच्यांची काळजी नाही आणि शंभर गावची वारकरी एका दिंडीत आहे पण कसलाही दुजा भाव नाही हीच वारकरी संप्रदायाची ताकद आहे.

ह्या सगळ्या घोष्टी घडतात आणि फक्त पायवरी दिंडी सोहळ्यात पांडुरंगाच्या दर्शनाची व भेटीची जणू वारकऱ्यांना लागली ओढ घेण्याची मुखात रामकृष्ण हरी , माऊली चे नामस्मरण करीत पायाच्या पायघड्या घालीत जणू वेड लावी जीवा अस प्रवास वारकरी माऊली च्या पालखी बरोबर देहू ते पंढरपूर पायवारी करीत.यातच निघोज येथील
चैतन्य कानिफनाथ दिंडी सोहळा २१वर्ष अविरत पायवारीचे सूत्रसंचालक ह. भ. प. गोरख ढवण नियमित सेवा करीत असून आज योगिनी एकादशी निम्मित दिंडीचे प्रस्थान करण्यात आले. पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ भास्करराव शिरोळे, बाबुशा अण्णा वरखडे, ज्ञानदेव लंके कोषाध्यक्ष मळगंगा ट्रस्ट, मार्गदर्शक देवरामबुआ लामखडे, रामुशेठ रासकर, लामखडे, वरखडे,लाळगे , शेटे, वराळ, भूकन, रसाळ,कोल्हे, ढवण, समस्थ वारकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button