किन्ही – बहिरोबावाडीत दारूबंदीची मागणी

पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील निघोज येथे महिलांच्या संघर्षामुळे दारूबंदी झाली. त्या धर्तीवरच आता तालुक्यातील किन्ही बहिरोबावाडी या गावात दारूबंदी व्हावी, अशी मागणी महिलांनी ग्रामसभेत केली. त्यानुसार ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला. याबाबत पारनेरचे निरीक्षक घनश्याम बळप यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. गावातील दारूबंदीसाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती महिलांनी केली.
दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाल्याने महिला व तरुण मुलींना त्रास होत आहे. गावातील दारूबंदी कार्यकर्ता शालूबाई साहेबराव साकुरे व सरपंच पुष्पा सदाशिव खोडदे यांनी यासाठी पुढाकार घेतला. किन्ही- बहिरोबावाडी गावात व परिसरात संपूर्ण दारूबंदी करावी, यासाठी गावातील महिलांनी दि. १३ जून रोजी ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्या ग्रामसभेत संपूर्ण दारूबंदीचा ठराव करण्यात आला. त्यामुळे गावात विक्री होत असलेली बेकायदा दारू विक्री पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्याकडे महिलांनी केली. यावेळी सरपंच पुष्पा शिवाजी खोडदे, दारूबंदी कार्यकर्त्या शालूबाई साहेबराव साकुरे, शाळूबाई खरात, हर्षदा खोडदे, कुसुम खरात, रेश्मा खरात, मंगल साकुरे, रंजना खोडदे, लताबाई खोडदे, सिंधुबाई खोसे, मंदा खरात, , मंगल खरात, शालूबाई खरात, ज्योती साकुरे, अश्विनी व्यवहारे, त्याचप्रमाणे उपसरंच हरेराम खोडदे, झुंबराबई साकुरे, मंगल खोसे, पुष्पा खोडदे, शोभा खोडदे, झुंबर साकुरे, कोमल व्यवहारे, मनीषा खोडदे, जयश्री खोडदे, शारदा किणकर, सुमन आतकर, सुरेखा खोडदे, सीताराम देठे, अशोक कीनकर, विजय खोडदे, शरद व्यवहारे, रोहिदास खोडदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची दुहेरी भूमिका !
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या संबंधातील काहींचे परिसरात हॉटेल आहेत. या हॉटेलवरच बेकायदा दारू विक्री होत असते. मात्र पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दारू विक्रीपासून परावृत्त करण्याऐवजी प्रोत्साहन दिले. दुसरीकडे महिलांना दारूबंदी आंदोलनास समर्थन देऊन दुहेरी भूमिका घेतली जाते. याबाबत मात्र ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.