सहकार

भोयरे गांगर्डा सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी माणिकराव पवार व उपाध्यक्ष पदी विजय चांगदेव कामठे !

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण समजणाऱ्या भोयरे गांगर्डा सोसायटी चेअमनपदी माणिकराव आण्णासाहेब पवार व व्हा. चेअरमनपदी विजय चांगदेव कामठे यांची सर्वानमते शुक्रवारी निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सरपंच भाऊसाहेब भोगाडे व दौलतराव गांगड यांनी जनसेवा सहकार पॅनलचे या निवडणुकीत बाजी मारली होती. यावेळी निवडीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. सी. पालवे तसेच सचिव जासूद यांनी काम पाहिले.या सेवा संस्थेच्या पदाधिकारी निवडीत चेअरमन माणिक पवार यांच्या नावाची सुचना संजय पवार यांनी केली तर त्यास अनुमोदक दादासाहेब रसाळ यांनी दिले.तर व्हा चेअरमन विजय कामठे यांच्या नावाची सुचना प्रदीप भोगाडे यांनी केली असून त्यास अनुमोदक सचिन रसाळ यांनी दिले आहे.
भोयरे गांगर्डा विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकी भैरवनाथ जनसेवा सहकार पॅनलने १२ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले तर विरोधी भैरवनाथ सहकार पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले. विविध कार्यकारी सेवा सोसायटी
निवडणुकीत एकूण ४५६ मतदानापैकी ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या सेवा संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी पवार संजय भाऊ, पवार माणिक अण्णा, रसाळ दादासाहेब सिताराम भोगाडे प्रदीप नामदेव, भोगाडे सागर भाऊसाहेब रसाळ सचिन ज्ञानदेव रसाळ अर्जुन भानुदास, कामठे विजय गुलाब, महिला प्रतिनिधी रसाळ प्रतिभा शिवाजी, भोगाडे उर्मिला लक्ष्मण, भटके-विमुक्त घुले लक्ष्मण रामभाऊ, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सातपुते कमळाबाई सुदाम उपस्थित होते. या निवडणुकीत उमेदवारांना विजयी करण्यासाठी दौलतराव गांगड, उपसरपंच मोहन पवार, माजी सरपंच भाऊसाहेब भोगाडे, आदिनाथ गायकवाड, सुभाष भोगाडे यांनी परिश्रम घेतले. या नवीन पदाधिकारांचे आमदार निलेश लंके यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button