इतर

कृषी विभागाने खतांच्या कृत्रिम टंचाई कडे लक्ष द्यावे– सुशांत आरोटे

अकोले प्रतिनिधी :-

सध्या पुरेसा पाऊस पडत आहे.शेतकरी बांधवांनी पेरणीची कामे करण्याची लगबग सुरू झाली आहे.
सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे आणि शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर बियाण्याची आवश्यकता असून मार्केट मध्ये विविध कंपन्यांच्या बियाण्यांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.ह्या सगळ्यात मार्केट मध्ये बोगस बियाणे येणार नाहीत यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कृषी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने नजर ठेवायला पाहिजे.जर बाजारात बोगस बियाणे आलेत आणि शेतकरी बांधवांची नुकसान झाल्यास अश्या कंपनी अथवा कृषी केंद्र चालकांविरुध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया आणि आंदोलन केले जाईल असा इशारा अकोले तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिला आहे


बोगस बियाणे विक्री होऊ नये.शेतकरी बांधवांनी आपली फसवणूक होऊ नये यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांकडून बियाणे अथवा खत खरेदी करताना पक्के बील घ्यावे. तसेच सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना जितके मागणी खताची केली जाईल तितके खत उपलब्ध करून देण्यात यावे.तसेच खत खरेदी करताना कोणत्याही प्रकारचे लिंकिंग करू नये.शेतकरी बांधवांना पक्के बिल द्यावेत.कृषी अधिकारी यांनी बाजारात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यावे.तसेच बोगस बियाणे करणाऱ्या मार्केटिंग प्रतिनिधी,बोगस खत विक्री करणारे यांवर लक्ष ठेवून कडक कारवाई करण्यात यावी.तसेच सर्व केंद्र चालक यांनी बाहेर मोठ्या अक्षरात खतांच्या स्टॉक ची माहिती फलक सर्वांना दिसेल अशा पद्धतीने बाहेर लावावा. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे,उपाध्यक्ष सुनील पुंडे कार्याध्यक्ष सुरेश नवले,शुभम आंबरे,सोमनाथ आहेर,अशोक दातीर,प्रशांत उगले,चंद्रकांत नेहे,एल,एम,नवले तसेच शेतकरी बांधवांनी केली आहे
.


कृषी विभागाच्या वतीने खतांच्या कृत्रिम टंचाई,बोगस बियाणे,बोगस बियाणे विक्री करणारे प्रतिनिधी,यांकडे बारीक लक्ष ठेवून तालुक्यात बोगस बियाणे विक्री होणार नाही तसेच युरिया खताची अथवा इतर खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही.याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. तसेच कृषी विभागाने भरारी पथक नेमताना त्यात पत्रकार, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी,प्रगतशील शेतकरी,सामाजिक कार्यकर्ते यांनाही सामील करून घ्यावे.,जर बोगस बियाणे आणि कृत्रिम खत टंचाई निर्माण झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.”

  • श्री सुशांत आरोटे
    तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अकोले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button