सहशालेय उपक्रमातुन आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा विकास साधावा..!- आयुक्त-नयना गुंडे

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
शैक्षणिक संकुल मवेशी ता.अकोले येथे प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धा व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या बक्षिस वितरण सोहळ्या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात आदिवासी विकास आयुक्त महा.राज्य नाशिक श्रीम.नयना गुंडे यांनी वरील उदगार काढले.
बक्षिस वितरण कार्यक्रमाला उपायुक्त आदि.विकास श्रीम.विनीता सोनवणे, श्री.यमाजी लहामटे,श्रीम.सुनिताताई भांगरे मवेशीचे सरपंच श्री.यमाजी भांगरे,सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे,रामदास भांगरे,संपत पोरे,परशुराम जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या भाषणात श्रीम नयना गुंडे मॅडम पुढे म्हणाल्या की, आश्रम शाळा,एकलव्य रेसिडेन्सियल पब्लिक स्कूल, नामांकीत शाळा व विविध शासकीय मुला-मुलींचे वसतीगृहांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सहा लाख विद्यार्थ्यांचे पालकत्व आदिवासी विकास विभाग समर्थपणे सांभाळत असुन आदिवासी विकास विभागातील विविध योजनांव्दारे नामवंत विद्यार्थ्यी आश्रमशाळेतुन घडत आहेत. आदिवासी विकास विभागाने दहा विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे व ते आज स्वाभिमानाने विविध पदावर कार्यरत असुन स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. असे शेवटी श्रीम. गुंडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.यमाजी लहामटे आपल्या भाषणात म्हणाले की,आज स्वातंत्र्या नंतरच्या अनेक तरुण पिढ्यांना सामाजिक भान आले असुन,स्वाभिमानाने जगत आहेत.यामागे आश्रम शाळा शिक्षकांचे योगदान खुप मोठे असुन आश्रम शाळांमुळे आदिवासी समाजाला आत्मभान आल्याचे श्री.लहामटे म्हणाले..पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीम. नयना गुंडे या होत्या.कार्यक्रमात प्रमुख आतिथींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरूवात झाली.तर राजुर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीम.देवकन्या बोकडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

येथे संपन्न झालेल्या क्रीडास्पर्धेत कबड्डी,खो खो,हाॅलीबाॅल,हॅन्डबाॅल,तसेच वैयक्तीक क्रीडाप्रकारात लांबउडी, उंचउडी, धावणे,गोळाफेक,भालाफेक, थाळीफेक या क्रीडाप्रकारात वय वर्ष 14,17 व 19 वर्ष वयोगटात सदर स्पर्धा संपन्न झाल्या असुन प्रकल्प स्तरीय क्रीडास्पर्धा व आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण विकासासाठी आश्रमशाळा प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा प्रदर्शन यशस्वीतेसाठी क्रीडासमितीसह विविध
प्रकाराच्या शिक्षकांच्या समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. या क्रीडास्पर्धेबरोबरच 105 शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला. असून पारितोषिक वितरण कार्यक्रमास सहा.प्रकल्प अधिकारी श्री. मनोजकुमार पैठणकर, दिपक कालेकर ,सुनील मोरे,
संजय सोनवणे,आंबादास बागुल,नानासाहेब झरेकर,प्रशांत हासे ,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.शिवराज कदम,उपाध्यक्ष आदिनाथ सुतार,गंगाराम करवर,विकास साळवे,गाढे,
श्री.धादवड,श्री.जगताप,मेजर बांबळे,बाळासाहेब शिरसाठ, शरद विटेकर, देविदास राजगिरे
पंडीत कदम,ज्योती निरभवणे, भाऊसाहेब खरसे,यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
या वेळी भरती पुर्व प्रशिक्षण केंद्रांच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन करून प्रमुख आतिथींना मानवंदना दिली.
शासकीय आश्रम शाळेला सलग सहाव्या वर्षी जनरल चॅम्पियन्स शिप

मान्वराच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली,तर प्रकल्पस्तरीय स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे
14 वर्ष वयोगट मुले-मुली-केळीरुम्हणवाडी, 17 वर्ष -मुले-मुली-मवेशी, केळीरुम्हणवाडी,19 वर्ष वयोगट -मुले-मुली-अकलापुर. खो-खो-14 वर्ष-मुले-मुली-मवेशी,केळीरूम्हणवाडी,17 -वर्ष-मुले-मुली-मवेशी,19-वर्ष-केळीरूम्हणवाडी.व्हाॅलीबाॅल-14-वर्ष-मुले-मुली-केळीकोतुळ, मवेशी.17 -वर्ष-मुले-मुली-अकलापुर.19-वर्ष-अकलापुर,केळीरुम्हणवाडी. हॅन्डबाॅल-14-वर्ष-मुले-मुली-केळीकोतुळ,मवेशी.17 -वर्ष-मुले-मुली-मवेशी,केळीरूम्हणवाडी. 19-वर्ष-केळीरूम्हणवाडी. रिले-4 बाय शंभर-14-आदर्श, इ.मा.राजुर, 17- अकलापुर, केळीकोतुळ, 19- अकलापूर, केळीरुम्हणवाडी.4 बाय चारसे-अकलापूर, इ.मा.राजुर,केळीरुम्हणवाडी. तसेच वैयक्तीक क्रीडाप्रकार स्पर्धासह सांस्कृतिक कार्यक्रमचे विद्यार्थ्यांना तर शिक्षक प्रदर्शनाचे शिक्षकांना बक्षिस वितरण करण्यात आले. उत्कुष्ठ स्पर्धा नियोजनाबाबत आयुक्त श्रीम नयना गुडे यांनी समाधान व्यक्त करून सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमात मुख्याध्यापक संघ,आदिवासी विकास कर्मचारी सोसायटी व ग्रामपंचायत मवेशी यांचेतर्फे शिवराज कदम,
चेअरमन गंगाराम करवर व मवेशीचे सरपंच श्री. यमाजी भांगरे यांनी मान्यवरांचे सत्कार केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नवनाथ गायकवाड यांनी केले तर मान्यवरांचे आभार श्री.दिपक कालेकर (सहा.प्रकल्प अधिकारी)यांनी मानले.
