क्राईम
पिंपरकण्यात मधुकर पिचड यांना मारहाणं

अकोले प्रतिनिधी
अकोले पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर रामचंद्र पिचड यांना तीन व्यक्तींनी मारहाण केली त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
त्यांच्या पिंपरकने येथील राहात्या घरात घुसून तीन व्यक्तींनी ही मारहाण केली. त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आपण घरी काम करत असताना कोहडी गावातील शिवाजी डोळस व त्यांच्या दोन साथीदारांनी (नाव माहीत नाही ) घरात घुसून मारहाण सुरू केली. त्यात आपला हात फ्रॅक्चर झाला आहे.पिचड यांना नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
मधुकर रामचंद्र पिचड यांच्या फिर्यादीवरून
शिवाजी डोळस व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे पुढील तपास करत आहे.