ग्रामीणमहाराष्ट्र
लांडेवाडी पायी दिंडीचे पाणसवाडीत स्वागत

विजय खंडागळे
सोनई-प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील लांडेवाडी येथील ह.भ.प.वैकुंठ वासी माधवबाबा लांडेवाडी कर यांची पायी दिंडीचे सालाबादप्रमाणे काल लांडेवाडी गावातून पंढरपूर कडे टाळ मृदंगाच्या गजरात भगव्या पताका सह प्रस्थान झाले
या पालखी सोहळ्याची पंढरपूर पायी दिंडी पाणसवाडी येथे येताच प्रा.रामकिसन शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी स्वागत केले. सदानंद शिंदे,राजेंद्र शिंदे,अशोक शिंदे,ह.भ.प सोन्याबापु सोनवणे,भाऊसाहेब गडाख,हरिभाऊ शिंदे,बाळासाहेब शिंदे,दिनकर गडाख,अशोक गडाख,भीमराज सोनवणे,बाळासाहेब सोनवणे,व झुंजार ग्रुपचे कार्यकर्ते हे दिंडी सोहळ्यास निरोप देण्यासाठी सहभागी झाले होते.
या प्रसंगी वारकरी यांना अन्नदान करण्यात आले.