महाराष्ट्र

आमदार निलेश लंके च्या पुढाकारातुन वारकऱ्यांची मोफत आरोग्य सेवा !

आ.निलेश लंके यांच्या मार्गदर्शना खाली आरोग्यरथ पायीदिंडी मध्ये सामील !

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :


मतदार संघातील माय बाप जनता हे माझे कुटुंब आहे . त्यासाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून जनतेने मला निवडून दिले आहे.त्यांचे सुख दुःख हे माझे आहे व ती माझी जबाबदारी आहे.असे नेहमी जाहिर सांगणारे व त्याप्रमाणेच अविरत कार्य करणारे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे नेहमी कार्यरत असतात . त्याचा प्रत्यय कोरोना या जैविक मारामारीत महाराष्ट्राने पाहिला आहे .
पाऊले चालती पंढरीची वाट !
या अभंगा प्रमाणे येऊ घातलेल्या आषाढी वारी मध्ये महाराष्ट्रभरातून लाखो भाविक भक्त आपल्या माय बाप माऊली परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पायी दिंडी सोहळ्यात सामील होत असतात.गेल्या दोन वर्षापासून कोरोणा या जैविक महामारी मुळे दिंडी सोहळा रद्द झाला होता .परंतु यावर्षी धार्मिक व मंगलमय वातावरणात पारनेर नगर विधानसभा मतदार संघातील अनेक दिंड्या या विठू माऊलीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झालेल्या आहेत .
दसवे द्वार पंढरी वैकुंठ भवन !
उभा नारायण समसृष्टी !!

विटेवरी उभा , चैतन्याचा गाभा , पडलिया प्रभा स्वरूपाची !
या अभंगाप्रमाणे या विलोभनीय परमात्मा परमेश्वर पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी व त्याचे दर्शन घेण्यासाठी ,अनेक विठ्ठल भक्तही या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये व त्यांना वैद्यकीय मिळत मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे व निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी ही संकल्पना आमदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्याकडे मांडली व आमदार साहेबांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली दहा तज्ञ डॉक्टरांची टीम व सर्व प्रकारचे औषधोपचार आषाढी एकादशीपर्यंत विनामूल्य देण्याचे आमदार साहेबांनी जाहीर केले .
आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत व पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजुभाऊ औटी, डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अर्जुनशेठ भालेकर , नगरसेवक आशोकशेठ चेडे , भुषण शेलार , श्रीकांत चौरे , विजय भास्कर औटी , डॉ . सचिन औटी , योगेश मते , बाळासाहेब नगरे , नितीन अडसुळ , सुभाष शिंदे , संभाजी पवार विठ्ठल दळवी , प्रवीन वारूळे , दिपक वाघ , दत्ता खताळ , वसंत पवार , भाऊ साठे , शंकर पंचमुख यांच्या सह डॉ. भुषण पवार,डॉ.राहुल भाईक ,डॉ.सौरभ बनसोडे ,डॉ.प्रतिक जगताप सह निलेश लंके प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी , हितचिंतक व सहकारी मित्रांच्या उपस्थितीत मंगळवारी अहमदनगर मध्ये या आरोग्य रथास आमदार निलेश लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत सदर आरोग्य रथाचे पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले .


वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा !

या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त परमात्मा परमेश्वर पंढरीचा राजा असणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करत असतात . महाराष्ट्रातील अनेक थोर संतांच्या दिंड्या व लाखो भावीक भक्त वारकरी या सोहळ्यातून आपल्या मायबाप परमात्म्याला भेटण्यासाठी पायी पंढरपूर कडे जात असतात . अनेक वृद्ध अपंग माता-भगिनी ही या परमात्म्याच्या भेटीसाठी आसुसलेले असतात . तालुक्याचा व मतदार संघाचा एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे . त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणे हे माझं कर्तव्य आहे . म्हणून मी दहा तज्ञ डॉक्टरांची टीम व सर्व प्रकारचे औषध उपचार आषाढी एकादशी पर्यंत हा आरोग्यरथ या पायी दिंडी सोहळ्यात देण्याचा मानस केलेला आहे . त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण औषधोपचारा सह डॉक्टरांची टीम पंढरपूर कडे रवाना करत आहे .सर्व विठ्ठल भक्त वारकरी भाविक भक्तांना ही पायी दिंडी सोहळा सुखकारक , यशदायी फलदायी व आरोग्यमय जावो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो

.आ.निलेश ज्ञानदेव लंके .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button