रिना हिरे यांना ‘कृषिथॉन इनोव्हेटिव्ह वूमन अॅग्री इंटरप्रेनर’ पुरस्कार !

सुषमा अंधारेच्या हस्ते पुरस्कार प्रदान!
नाशिक : कृषी क्षेतात विशेष उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल आर्मर हेलिक्स इंडियाच्या संचालक रिना रमेश हिरे यांना ‘कृषिथॉन इनोव्हेटिव्ह वूमन अॅग्री इंटरप्रेनर २०२२’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुषमा अंधारे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रिना हिरे या उच्च शिक्षित असून उत्पादनशील देशी गाईंची संख्या वाढवण्यासाठी आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करतात. यासाठी त्यांनी २०१७ मध्ये ‘आर्मर हेलिक्स इंडिया’ या स्टार्टअपची स्थापना केली आहे. ही कंपनीची भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेत सहभागी असून, पशु विज्ञान केंद्र आयव्हीआरआय (बरेली) येथे या स्टार्टअपची निवड करण्यात आलेली आहे. भारत सरकारच्या नाविण्यपुर्ण स्टार्टअपमध्येही त्यांची निवड झाली आहे. हिरे यांच्या ५० देशी गीर जातीचे आयव्हीएफ तंत्रज्ञानाने वासरे तयार केली जातात. उच्च गुणसुत्रांच्या व अधिक दुध उत्पादनक्षम देशी गाई आयव्हीएफ तंत्रज्ञानाने जन्माला आणणे व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देणे हा त्यांच्या स्टार्टअपचा मुख्य उद्देश आहे.