शून्य ऊर्जा शीतगृहामुळे चार दिवस भाजीपाला टिकविणे होणार शक्य!

दत्तात्रय शिंदे/माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील माका येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या मुळा एज्यूकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय सोनई येथील ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम अतंर्गत भाजीपाला ठिकवून ठेवण्यासाठी शून्य ऊर्जा शीतगृहाचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमा अंतर्गत कृषी महाविद्यालय सोनईचे प्राचार्य डॉ.एच.जी.मोरे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एन.दरंदले सर, प्रा.गवांदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत धिरज किरण खंबाईत, संकेत लक्ष्मण चव्हाण, कृष्णा सतिश घुमरे, पंकज विक्रम जगताप, अमन नवाज देशमुख, बोड्डुपली हरी प्रसाद यांनी माका गावात शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतगृहाचे मागदर्शन तसेच महत्त्व पटवुन दिले.
शून्य ऊर्जा शीतगृह म्हणजे काय, शीतगृहाचे फायदे काय, शीतगृहाची घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती सांगितली. शेतकऱ्यांना शीतगृहाचा आराखडा आणि उभारणी याचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले. व तसेच या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून भाजीपाला जास्तकाळ टिकविणे शक्य होणार आहे.
या उपक्रमा वेळी श्री.रमेश कराळे, डॉ. देविदास होंडे,
श्री.आदिनाथ म्हस्के, श्री.पंढरीनाथ दारकुंडे, श्री.अरुण दारकुंडे, श्री.सिद्धार्थ अष्टेकर, श्री.अमोल कोकाटे आदी ग्रामस्थ व तसेच विद्यार्थी उपस्थित होते.