
सोनई प्रतिनिधी
–नेवासा तालुक्यातील बेल्हेकर वाडीत हनुमान जयंती उत्सहात साजरी झाली
गोणेगाव येथील ह.भ.प.भगवान महाराज जंगले यांच्या काल्याच्या किर्तनाने , आदर्श गाव बेल्हेकर वाडी येथील रेणुका दरबारचे ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला बाल चमू नी रामायणातील राम, लक्ष्मण, सीता,हनुमान, संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई,एकनाथ महाराज यांच्या वेशभूषा करून भाविकांना एक आकर्षक देखावपात्र लक्ष वेधून घेत होती.
या वेळी जयश्री गडाख, उषा गडाख,सविता राऊत,केंदळचे अन्नदाता उद्योगपतीं बाजीराव आढाव,सौ. संगीता आढाव,माजी आदर्श सरपंच भरत बेल्हेकर,जनार्धन बेल्हेकर, गणपत शिंदे,तुकाराम शिंदे,आसाराम बेल्हेकर, जगदीश शिंदे,सुदाम येळवते,सुरेश शिंदे,मल्हारी बेल्हेकर, माऊली शिंदे,अशोक वैरागर, प्रा.ढगे, महेबूब शेख,यांच्या सह भजनी मंडळ आदी उपस्थित होते.मा.आदर्श सरपंच भरत बेल्हेकर यांच्या हस्ते सर्वाचा सन्मान करण्यात आला.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सप्ताह यशस्वी होण्यासाठी व्यासपीठ चालक ह.भ.प.सदाशिव तोगे, ह.भ.प.गोपीनाथ लोहकरे,रावसाहेब बेल्हेकर, रामभाऊ शिंदे,राजेंद्र बेल्हेकर, विनेकरी एकनाथ बेल्हेकर, नामदेव शिंदे,जिजाबाई बेल्हेकर, लक्ष्मीबाई शिंदे, सुभद्रा बाई बेल्हेकर, चांगुणाबाई बेल्हेकर, अल्काताई शिंदे,शोभाताई शिंदे,तुळसाबाई शिंदे,जिजाबाई शिंदे,भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले.