ग्रामीणसहकार

पाडळी रांजणगाव सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी डी.बी. करंजुले ,व्हाइस चेअरमनपदी आप्पासाहेब कळमकर बिनविरोध


दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी


पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव विकास सेवा सहकारी संस्थेवर सरपंच विक्रमसिहं कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली असून संस्थेच्या चेअरमनपदी डी. बी करंजुले व्हाइस चेअरमनपदी आप्पासाहेब कळमकर यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत चेअरमन पदासाठी डी. बी.(आण्णा) करंजुले तर व्हा. चेअरमन पदासाठी आप्पासाहेब कळमकर यांचे प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने त्यांची निवड करण्यात आली.
या वेळी पॅनल प्रमुख सरपंच विक्रमसिहं कळमकर यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य आप्पासाहेब साठे,सुदाम साठे, एकनाथ साठे,कांतीलाल उबाळे,गणेश करंजुले संभाजी करंजुले भगवान उघडे, वामन जाधव,गणेश कळमकर, नंदाबाई कळमकर, उपस्थित होते.

   

सभासद हिताला प्रधान्य देऊ.

पाडळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांनी व ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास टाकत एकतर्फी सत्ता दिली.व आता संचालकांनी प्रमुख पदाची जबाबदारी दिली ती खंबीरपणे पार पाडून सर्व सभासदांना न्याय देत संस्थेचे व सभासदांचे हित जोपासण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.
– डी.बी. (आण्णा)करंजुले
-आप्पासाहेब कळमकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button