शनिशिंगणापूर ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान, ठीक ठिकाणी स्वागत

सोनई ( विजय खंडागळे)–
धार्मिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्यातील वै. महंत उदासी महाराज आषाढी एकादशी पंढरपूर वारी पालखी सोहळ्याचे शनिशिंगणापूर ते पंढरपूर पालखी पायी दिंडीचे प्रस्थान नुकतेच झाले.
प्रारंभी शनिपादुकाचे मंदिरात पुरोहित अशोक देवा कुलकर्णी यांच्या वेद मंत्र घोषात विश्वस्त मंडळाच्या वतीने पूजन करण्यात आले.
शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान संचालित शनी महाराजांची पालखीला ३० वर्ष पूर्ण झाले आहे,१९९१ साली तत्कालीन अध्यक्ष स्व. बाबुराव बानकर यांनी सदर दिंडीचा प्रारंभ केला होता, पाहिले दोन वर्षे राष्ट्रसंत ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मठात वारकरी यांना आश्रय देण्यात आला होता, नंतर श्री.क्षेत्र पंढरपूर येथे देवस्थानचे सर्व सुविधा उपलब्ध करून आज शनिमठ कार्यरत आहे.
सालाबादप्रमाणे काल शनिशिंगणापूर गावातून ह.भ.प.विश्वास राव गडाख यांच्या हस्ते पंढरपूर कडे टाळ मृदंगाच्या गजरात भगव्या पताका सह पालखीचे प्रस्थान झाले.
या पालखी सोहळ्याची पंढरपूर पायी दिंडी या वर्षी मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले आहे. ठीक ठिकाणी पालखी येताच ग्रामस्थ पूजन व स्वागत करत आहेत. ह.भ. प.विश्वास राव गडाख,आप्पासाहेब निमसे,ऍड.सायराम बानकर, अध्यक्ष भागवत बानकर,सरचिटणीस आप्पासाहेब शेटे,पंढरीनाथ शेटे,माजी उपाध्यक्ष सुरेश बानकर,पोपट शेटे,आप्पा कुऱ्हाट,आदिनाथ शेटे,व्यवस्थापक संजय बानकर,भाऊसाहेब येळवंडे, दादासाहेब दरंदले,पत्रकार विजय खंडागळे,ग्रामस्थ व विश्वस्त हे दिंडी सोहळ्यास निरोप देण्यासाठी सहभागी झाले होते.
या प्रसंगी वारकरी यांना विविध सूचना,नियम, सांगण्यात आले. यावेळी रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती.