इतर

औषधी वनस्पतींची शेती करणे काळाची गरज- डॉ.पाटील


विलास तुपे

राजूर /प्रतिनिधी
आपला निसर्ग हा सर्वगुण संपन्न आहे. निसर्गामध्ये जैवविविधता ओतप्रोत भरलेली आहे. या जैवविविधतेचे संवर्धन व संगोपण करणे ही आता काळाजी गरज आहे. या जैवविविधते बरोबरच करावी लागणार आहे. त्यातूनच आपल्या सर्वांचे आरोग्य सुदृढ होणार आहे. असा आत्मविश्वास महाराष्ट्र राज्याचे जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस.एच.पाटील यांनी व्यक्त केला.

शेंडी, भंडारदरा येथील कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने व सावित्रीबाई फुले पुणे प्रवरानंगर, सात्रळ व राहता महाविद्यालय यांच्या संक्लपनेने एक दिवसीय औषधी वनस्पतींचे संवर्धन लागवड मूल्यवर्धन व बाजारपेठ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शानातून जैवविविधता व औषधी वनस्पतींचा मानवी जीवनातील उपयोग यावर त्यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून औषधी वनस्पतींची माहिती देतांना त्यांचे उपयोग व महत्व विशद केले. डॉ.प्रदिप दिघे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सत्र संपन्न झाले.

यावेळी प्रस्ताविकातून पश्चिम विभागीय क्षेत्रीय संचालक व प्रमुख संशोधक डॉ.दिगंबर मोकाट यांनी औषधी वनस्पतींच्या विविध प्रजातींची माहिती देताना प्रत्येक वनस्पतींचे मानवी जीवनातील महत्व विशद केले. हिरडा, बेहडा, आवडा, अडुळसा व शेवगा ह्या वनस्पती दुर्धर आजारावर किती उपयुक्त आहेत त्यांचे महत्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. या उद्घाटन सत्रावेळी भंडादराचे वनविभाग अधिकारी अमोल आडे, डॉ.स्वप्निल शिंदे यांच्या सह अकोले, राजूर, शेंडी व भंडारदरा येथील २०० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. सुरुवातीला प्राचार्य बाबासाहेब देशमुख यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ.दिघे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत्तून कोव्हिडच्या काळात औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींचे कोव्हीडच्या काळात औषधी वनस्पती असणाऱ्या वनस्पतींचे महत्व विशद केले. या कार्यशाळेत डॉ.दिगंबर मोकाट, डॉ.स्वप्निल शिंदे, डॉ.नयनसिहं ठाकूर यावर अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले. सहभागी शेतकऱ्यांनी आपल्या विविध शंका यावेळी उपस्थित केल्या. यासर्व शंकाचे अभ्यासपुर्ण रितीने व उदाहरणे देऊन निरसण केले. आज पर्यंत अशा पध्दतीचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले नाही. अशा भावना सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. संपुर्ण दिवसभर चाललेल्या प्रशिक्षणातून अभ्सासकांनी अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले. त्याचा सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना निश्चितच फायदा होईल अशा आशावाद या कार्यशाळेचे या समन्वयक डॉ.महेश खर्डे यांनी व्यक्त केला. या दिवसभर चाललेल्या कार्यशाळेसाठी डॉ.अनिल वाबळे, डॉ.रामदास बोरसे, डॉ.दिपक घोलप, डॉ.संजय गिरी डॉ.बाळासाहेब मुंजे, डॉ.संजय लाहरे मोलाचे सहकार्य केले. ही कार्यशाळा तीन सत्रामध्ये संपन्न झाली. तीन्ही सत्रांचे निवेदन डॉ.शांताराम चौधरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button