राज्यातील नव्या सरकारचे सुप्यात केले जल्लोषात स्वागत !

राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लावणार : सागर मैड
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार पडल्यामुळे व शिवसेनेच्या एक गटाने भाजपसोबत युती केल्यानंतर राज्यात आता भाजप व शिवसेना बंडखोर शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले व मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पारनेर तालुक्यातील सुपा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला.
यावेळी पारनेर तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस सागर मैड, सुरेश बाफना, सोमनाथ नांगरे, दत्तात्रय टकले, संतोष उमाप, प्रसाद पवार, प्रफुल पवार, सागर कुंडलीक, पंकज चितळकर, अजय येणारे, नागेश साबळे, सचिन उमाप, सचिन मोहिते, अमोल मैड तसेच यावेळी भाजपचे सुपा येथील व पारनेर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस सागर मैड म्हणाले की राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप व शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले असून एकनाथ शिंदे सारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला भाजप पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे मुख्यमंत्रीपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. यापुढील काळात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे राज्यात एक नवे विकास पर्व घेऊन येतील व राज्याला चांगले उंचीवर घेऊन जातील. सुपा परिसरामध्ये काम करत असताना राज्य सरकारच्या माध्यमातून आता विविध विकासाच्या योजना यापुढील काळात राबवणार आहे वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून अनेक कामे आता मार्गी लावणार आहे.