मोबाईल शॉपी फोडून चोरी करणाऱ्यास राजुर पोलिसांनी केले जेरबंद!

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
राजूर येथील मोबाईल शॉपी दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीस राजूर पोलिसांनी जेरबंद केले
दि.16/06/2022 रोजी राजुर (ता.अकोले )जि.अहमदनगर येथील अपना मोबाईल शॉपी दुकान रात्री कोणीतरी अज्ञात इसमांनी फोडुन दुकाणातील एकुण 29000/-रु.किमतीचा मोबाईल, व मोबाईल एक्सेसरीज सामान चोरुन नेले.
याबाबत राजुर पोलीस स्टेशन गु.र.नं.I 119/2022 भा.द.वी.कलम 380,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि नरेंद्र साबळे तसेच पोलीस कर्मचारी हे करित असताना, तांत्रिक तपासा द्वारे सदरचा गुन्हा हा विजय बाळु शिंदे, रा.चंदनवाडी, राजुर, ता.अकोले याने केले बाबत निष्पन्न झाले. पोलीस स्टाफ यांनी मिळुन आरोपी विजय बाळु शिंदे, वय-33 वर्षे, रा.चंदनवाडी, राजुर, ता.अकोले यास ताब्यात घेवुन सदर गुन्हा बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. सदर आरोपीकडुन खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
1)20,000/- रु. कि.चा विवो कंपणीचा Y33T मोबाईल कि. अ.
2)9,000/-रु. कि.ची मोबाईल एक्सेसरीज
तरी आरोपीने वरील चोरी केलेले संपुर्ण साहित्य त्याचे ताब्यातुन जप्त केले आहे. आरोपी यास अटक केली असुन पुढील तपास मपोना/रोहीणी वाडेकर करत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री.मनोज पाटील सो.पोलीस अधिक्षक अहमदनगर,मा.श्रीमती स्वाती भोर मँडम,अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व मा.श्री. राहुल मदने सो.उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी सपोनि/नरेंद्र साबळे व अंमलदार- मपोना/रोहिणी वाडेकर, पोकाँ/ अशोक गाढे, पोकाँ/ विजय फटांगरे,पोकाँ/ आकाश पवार, चापोना/ पांडुरंग पटेकर यांनी केला आहे.
—-//—